आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
चालकाला अपस्माराचा झटका आल्याने, बेस्ट बस मोनोच्या खांबाला धडकल्याची घटना सकाळी चेंबूर कॉलनी परिसरात घडली. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. बसचे मात्र काही प्रमाणात नुकसान झाले आहे. चेंबूर वाशी नाका येथून वातानुकूलित लहान बस रविवारी सकाळी अकराच्या सुमारास कुर्ला रेल्वे स्थानक येथे जात होती.
बस चेंबूर कॉलनी येथील नवजीवन सोसायटी समोर आली असता, चालकाला अचानक अपस्माराचा झटका आला. त्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस मोनोच्या खांबाला धडकली. यावेळी बसमध्ये १२ ते १५ प्रवासी होते. काही स्थानिकांनी तत्काळ बस चालकाला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.
First published on: 24-07-2022 at 15:40 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best bus hits monorail pole in chembur mumbai print news zws