शिवाजी पार्कवर पालिका निवडणुकीची सभा घेण्यास न्यायालयाने नकार दिल्यानंतर त्यावर टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाखतीची चित्रफित सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले.  एका पक्षाच्या दसरा मेळाव्याला परवानगी देणारे न्यायालय दुसऱ्या पक्षाच्या सभेला परवानगी कशी नाकारू शकते, असा सवाल करीत राज यांनी पत्रकार परिषद घेऊन न्यायालयाच्या निर्णयाप्रती नाराजी व्यक्त केली होती. राज यांनी न्यायालयाचा अवमान केला असल्याचा आरोप करीत अॅड्. एजाज नक्वी यांनी राज यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल केली होती. ही टीका न्यायमूर्तीविरोधात नव्हती, तर परिस्थितीला धरून एका नागरिकाने केलेली टीका असल्याचा दावा राज यांनी केला होता. तसेच आपल्या मुलाखतीचा प्रसिद्धीमाध्यमांनी विशेषत: अमराठी प्रसिद्धीमाध्यमांनी चुकीचा अर्थ लावून ती प्रसिद्ध केल्याचाही दावा राज यांनी केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombay high court seeks video of raj thackerays interview in contempt of court case