बोरीवलीमधील तीन मजली साईबाबा नगरमधील गितांजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत सर्वत्र दहीहंडीचा उत्साह शिगेला असताना बोरिवलीत दुपारी तीन मजली इमारत कोसळली. बोरिवली पश्चिमेला असलेल्या साईबाबा नगरातील ही इमारत आहे. दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. साईबाबा मंदिराजवळ असलेली गीतांजली ही तीन मजली इमारत अचानक कोसळली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक आणि पोलीस पथक दाखल झाले आहे. दुपारी पाऊणच्या सुमारास अग्निशमन दलाने दुर्घटनेचा स्तर दोन असल्याचे जाहीर केले. त्यामुळे घटनेचे गांभीर्य वाढले होते. मात्र, इमारत आधीच रिकामी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

ही इमारत आधीच धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे पालिकेच्या विभाग कार्यालयाने ती आधीच रिकामी केली होती. मात्र तरीही ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहे का, याचा शोध सुरू आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Borivali building collapsed saibaba nagar gitanjali fire brigade reached the spot pmw
First published on: 19-08-2022 at 13:14 IST