बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे जे आवाहन केले जात आहे ती पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. शाहरुखने चेन्नई पूरग्रस्तांना १ कोटींची मदत जाहीर केल्यानंतर मनसेने शाहरुखला महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांचा विसर पडल्याचे सांगत त्याच्या आगामी ‘दिलवाले’ चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये होते. त्यानंतर मंगळवारी समाजमाध्यमांत राज यांच्या स्पष्टीकरणाचे प्रसिद्धीपत्रक फिरू लागले आहे.
मनसेच्या आवाहनाला शाहरूखने असे दिले प्रत्युत्तर
शाहरुखने चेन्नई पूरग्रस्तांना १ कोटींची मदत केली, पण तो महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना विसरला म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने केलेला निषेध हा योग्य आहे. मात्र, त्याच्या चित्रपटावरील बहिष्कार टाकण्याचे करण्यात आलेले आवाहन पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्टीकरणात म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रात यायचं, मोठं व्हायचं, नाव कमवायचं आणि मग महाराष्ट्रालाच विसरायचं हे योग्य नाही. ही जाण त्यांनी ठेवली पाहिजे, असंही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Dec 2015 रोजी प्रकाशित
शाहरुखचा निषेध, पण चित्रपटावर बहिष्कार नाही- राज ठाकरे
समाजमाध्यमांत राज यांच्या स्पष्टीकरणाचे प्रसिद्धीपत्रक फिरू लागले आहे.
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड
Updated:

First published on: 15-12-2015 at 14:04 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boycott dilwale its not party official decision says raj thackeray