मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) नेतृत्वाखालील बँकांच्या संघाचे ८० कोटी ७३ लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नुकताच दहिसर येथील ॲल्युमिनियम फॉइलची निर्मिती करणारी कंपनी, तिचे संचालक आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी मुंबईसह गाझियाबाद, हिमाचल प्रदेश येथे सीबीआयने शोध मोहीम राबवली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या कंपनीने कर्ज मिळवण्यासाठी आर्थिक नोंदी असलेल्या कागदपत्रांमध्ये बदल करून सादर केले. त्याद्वारे मिळालेली कर्जाची रक्कम इतर ठिकाणी वापरण्यात आल्याचा आरोप आहे. २००९ ते २०२१ या कालावधी हा गैरव्यवहार झाला असून त्याबाबत एसबीआयने सीबीआयकडे तक्रार केल्यानंतर नुकताच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी मे. पार्थ फॉईल, कंपनीचे संचालक पार्थो विजोय दत्ता व अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा >>> मुंबई महानगरपालिकेच्या तीन नव्या सीबीएसई शाळा सुरू

तक्रारीनुसार, कंपनीची कर्जाची खाती २०२१ मध्ये बुडीत घोषित करण्यात आली होती. त्याबाबत करण्यात आलेल्या तपासणीत कर्ज मिळवण्यासाठी कर्जदार कंपनी आणि तिच्या प्रवर्तकांनी फेरफार केलेले स्टॉक बुक, स्टेटमेंट सादर करण्यात आले. तसेच कर्जाची रक्कम इतरत्र वळण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर याप्रकरणी सीबीआयकडे तक्रार करण्यात आली होती. याप्रकरणी सीबीआयने मुंबई, गाझियाबाद आणि हिमाचल प्रदेशातील बद्दी यासह अनेक ठिकाणी शोध मोहीम राबविली. त्यात संशयीत कागदपत्रे, हार्ड डिस्क, इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादी जप्त करण्यात आल्याचे सीबीआयकडून सांगण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbis search operation in mumbai along with ghaziabad and himachal pradesh mumbai print news ysh