माटुंगा स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनजवळील मुळापासून कुजलेले एक झाड शुक्रवारी दुपारी ओव्हरहेड वायरवर कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे दीड तास विस्कळीत झाली होती. या घटनेमुळे माटुंगा स्थानकात टिटवाळ्याहून छत्रपती शिवाजी टर्मिसच्या दिशेने जाणारी लोकल (अप धिम्या मार्गावर) अडकून पडल्याने छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या (धीम्या) येणाऱ्या जलदगती मार्गावरील वाहतूकीवर त्याचा परिणाम झाला. परिणामी रेल्वेमार्गावर लोकलच्या रांगाच रांगा लागल्या. बराच वेळ लोकल जागच्या हालत नसल्याने लोकलमध्येच अडकून पडलेल्या अनेक प्रवाशांनी भर उन्हात रेल्वेमार्गातून पायपीट करणे पसंत केले.
रेल्वे म्हणते..
दरम्यान, ओव्हरहेड वायरवर झाडाच्या फांद्या पडल्याने विद्युत प्रवाह खंडीत झाला होता. त्यामुळे १२ गाडय़ा रद्द करण्यात आल्या तर १२ गाडय़ा अन्यत्र वळविण्यात आल्या. नेहमीच्या वेळेपेक्षा गाडय़ा १५ ते २० मिनीटे उशिराने धावत होत्या, असे रेल्वेच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Mar 2013 रोजी प्रकाशित
झाड कोसळल्याने मध्य रेल्वेचा खोळंबा
माटुंगा स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनजवळील मुळापासून कुजलेले एक झाड शुक्रवारी दुपारी ओव्हरहेड वायरवर कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे दीड तास विस्कळीत झाली होती. या घटनेमुळे माटुंगा स्थानकात टिटवाळ्याहून छत्रपती शिवाजी टर्मिसच्या दिशेने जाणारी लोकल (अप धिम्या मार्गावर) अडकून पडल्याने छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या (धीम्या) येणाऱ्या जलदगती मार्गावरील वाहतूकीवर त्याचा परिणाम झाला.

First published on: 30-03-2013 at 03:43 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railways got disrupted after tree fell down on the overhead wire