नागरी सेवा मुख्य परीक्षेला बसलेल्या व मुलाखतीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांकरिता ‘राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थे’तर्फे विनामूल्य मुलाखत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ८ ते ११ मार्च या कालावधीत हा कार्यक्रम होईल. डिसेंबर,२०१३च्या ‘नागरी सेवा मुख्य परीक्षे’चा निकाल मार्च, २०१४च्या शेवटच्या आठवडय़ात अपेक्षित आहे. त्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
ज्या उमेदवारांना या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी २६ फेब्रुवारीपर्यंत छायाचित्र लावलेला विहित नमुन्यातील अर्ज ६ प्रतीत व सोबत हॉलतिकिटाची छायाप्रत लावून कार्यालयात सादर करायचा आहे. विहित अर्ज कार्यालयात तसेच संस्थेच्या http://www.siac.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. मुंबई बाहेरील विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था होणार नाही.
  संग्रहित लेख, दिनांक 4th Feb 2014 रोजी प्रकाशित  
 नागरी सेवा मुलाखती प्रशिक्षण वर्गाचे आयोजन
नागरी सेवा मुख्य परीक्षेला बसलेल्या व मुलाखतीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांकरिता ‘राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थे’तर्फे विनामूल्य मुलाखत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
  First published on:  04-02-2014 at 12:02 IST  
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Civil service interviews training class conducted