वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात, जखमींना नेण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेलाच तीन वाहनांची धडक, पाचजणांचा मृत्यू | collision between four cars and an ambulance on Bandra Worli Sea Link in Mumbai sgy 87 | Loksatta

Bandra-Worli Sea Link Accident: जखमींना नेण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेलाच गाड्यांची धडक, वाहनांचा अक्षरश: चुराडा, पाचजणांचा मृत्यू

मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर रात्री भीषण अपघात, चार वाहनं आणि रुग्णवाहिकेची धडक

Bandra-Worli Sea Link Accident: जखमींना नेण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेलाच गाड्यांची धडक, वाहनांचा अक्षरश: चुराडा, पाचजणांचा मृत्यू
मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर गाड्यांची एकमेकांना धडक

मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर रात्री भीषण अपघात झाला आहे. चार गाड्या आणि एक रुग्णवाहिका एकमेकांवर आदळून झालेल्या या अपघातात पाचजणांचा मृत्यू झाला आहे. तर तिघे गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. अपघात इतका भीषण होता की, पाचही गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला आहे. जखमींना जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

कसा झाला अपघात?

मिळालेल्या माहितीनुसार, सी-लिंकवर एका कारचा अपघात झाला होता. यावेळी जखमींना नेण्यासाठी रुग्णवाहिका पोहोचली होती. पण याचवेळी तेथून जाणाऱ्या तीन गाड्यांनी अपघातग्रस्त वाहनासह रुग्णवाहिकेलाही धडक दिली. यानंतर सी-लिंकवर एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

अपघातात जखमी झालेल्या चार ते पाच लोकांची स्थिती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. सर्व जखमींवर उपचार सुरु असून, त्यांच्या नातेवाईकांना कळवण्यात आलं आहे.

पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
दसरा मेळाव्याचा आखाडा ; शक्तिप्रदर्शनासाठी सज्जता: शिवाजी पार्क, बीकेसीकडे सर्वाचे लक्ष

संबंधित बातम्या

गुजरात निवडणुकीसाठी जाणे हे अधिकृत काम आहे का?; न्यायालयाचे राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांना खडे बोल
‘अदानी’च्या अर्जावर प्रक्रिया सुरू; नवी मुंबईसह मुलुंड-भांडुप, पनवेल भागात वीज वितरण परवाना
समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार?; आरोपांच्या चौकशीसाठी अधिकाऱ्याची नियुक्ती
कलापिनी कोमकली यांच्याशी आज स्वरगप्पा
शिवसेनेच्या ‘वायफाय’ घोषणेची भाजपकडून पूर्ती!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
सीआरपीएफ जवानाच्या गोळीबारात दोन सहकारी ठार
FIFA World Cup 2022: पोलंडचा सौदी अरेबियावर विजय; लेवांडोवस्कीची चमक
देविकाचा ऑलिम्पिक पदकाचा ध्यास!
India New Zealand ODI Series: सलामीवीरांकडून आक्रमकतेची अपेक्षा!
FIFA World Cup 2022: ऑस्ट्रेलियाची टय़ुनिशियावर मात