कदम गटाला डावलून काँग्रेसमधील दादा गट राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करण्यास इच्छुक असून यासंदर्भात प्राथमिक बोलणी विशाल पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव िशदे यांच्यात झाली. काँग्रेसमध्ये जत आणि मिरज तालुक्यातील उमेदवारीवरून गटबाजी उफाळून येण्याचा धोका असून याबाबत मुंबईत दोन गटात खडाजंगी झाल्याचे वृत्त आहे.
राष्ट्रवादीशी कोणत्याही प्रकारची आघाडी करण्याची इच्छा नाही, जिल्ह्यात राष्ट्रवादी संपली असून बोलणी करण्याची इच्छाच नाही अशी भूमिका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम यांनी वेळोवेळी जाहीरपणे व्यक्त केली आहे. मात्र राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष िशदे यांनी आघाडी करण्यास अखेरपर्यत प्रयत्न करू असे सांगत चच्रेची दारे खुली असल्याचे सांगितले आहे.
या पाश्र्वभूमीवर जत आणि मिरज तालुक्यातील जागा वाटप पक्षांतर्गत कुणाला किती यावरून दोन गटात संघर्ष उफाळला आहे. जिल्हा बँकेचे संचालक विक्रम सावंत यांनी आपण सांगू तीच यादी अंतिम असेल अशी भूमिका घेतली असल्याने याला जतमधील वसंतदादा आघाडीचे सुरेश िशदे यांनी आक्षेप घेतला आहे. या वादावरून मुंबईत झालेल्या प्रदेश समितीच्या बठकीमध्ये वाद झाल्याने यादी अंतिम झाली नाही. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी, तोडगा काढण्यासाठी निरीक्षक पाठविण्यात येईल. निरीक्षकांच्या अहवालानंतर यादी अंतिम करण्यात येईल अशी भूमिका घेतली आहे.
दरम्यान, याच बठकीमध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री पक्षाच्या कोअर कमिटीमध्ये महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा शैलजा पाटील यांना डावलत असताना एकाच कदम घराण्यातील तिघांचा म्हणजे डॉ. पतंगराव कदम, आ. कदम आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांचा समावेश कशासाठी असा सवाल उपस्थित केला.
दरम्यान, गटाच्या वर्चस्वासाठी पक्षीय पातळीवर दादा गटाकडून कदम गटाला लक्ष्य केले जात असतानाच विशाल पाटील यांनी राष्ट्रवादीशी संधान साधले आहे. बाजार समितीच्या माध्यमातून एकत्र आलेल्या भाजपाचे अजितराव घोरपडे यांच्या विकास आघाडीने राष्ट्रवादीशी मत्री केली असून याच धर्तीवर मिरज आणि जत तालुक्यात राष्ट्रवादीशी मत्रीचा प्रस्ताव दिला आहे. जतमध्ये माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनीही या मत्रीला हिरवा कंदील दर्शविला आहे.