मालेगाव येथे २००८ मध्ये  स्फोट घडविण्यात येणार असल्याचे आपल्याला माहीत होते, असा जबाब महानगरदंडाधिकाऱ्यांकडे देणाऱ्या साक्षीदाराला सहआरोपी बनविण्याबाबत विचार केला का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेसह (एनआयए) राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) करून त्याबाबत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.स्फोटातील आरोपी समीर कुलकर्णी याने पत्र लिहून न्यायालयाला साक्षीदाराच्या जबाबाबाबत कळविले.  न्या. एस. सी. धर्माधिकारी आणि न्या.अभय ठिपसे यांच्या खंडपीठासमोर कुलकर्णी याच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने ही विचारणा केली.