प्रख्यात चित्रकार व शिल्पकार हेमा उपाध्याय आणि वकील हरीश भंबानी यांच्या दुहेरी हत्याप्रकरणात पोलिसांनी तिचा पती चिंतन उपाध्याय यांच्यावर अद्याप संशय कायम ठेवला आहे. त्यातच हेमाच्या नातेवाईकांची चिंतनच्या सहभागाविषयी चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच फेसबुकवरील प्रोफाईलमध्ये चिंतन यांनी हेमा यांची हत्या होण्याच्या दिवशी अलविदा हे गाणे टाकल्यामुळे ते अधिकच अडचणीत आले आहेत. हे गाणे हा निव्वळ योगायोग असू शकतो. परंतु सर्व दुवे तपासले जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
या हत्याकांडातील प्रमुख सूत्रधार असलेल्या विद्याधर राजभर याचा जोपर्यंत शोध लागत नाही तोपर्यंत नेमका हेतू स्पष्ट होणार नाही. विद्याधरच्या अटकेनंतरच चिंतन याचा सहभाग होता किंवा नाही, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे तूर्तास वेगवेगळ्या पद्धतीने चिंतनशी विविध बाबींचा तपास केला जात असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. अद्याप तरी चिंतनचा संबंध स्पष्ट झालेला नाही, असेही त्याने स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 19th Dec 2015 रोजी प्रकाशित
फेसबुकवरील ‘अलविदा’ गाण्यामुळे चिंतन उपाध्याय अडचणीत?
या हत्याकांडातील प्रमुख सूत्रधार असलेल्या विद्याधर राजभर याचा जोपर्यंत शोध लागत नाही
Written by मंदार गुरव

First published on: 19-12-2015 at 04:06 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Create controversy alvida song on facebook