फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅपवरील संभाषणाला प्रेम समजून त्यानंतर प्रेमभंगात निराश झालेल्या तरुणाने रविवारी एका १६ वर्षीय मुलीची हत्या केली होती. या तरुणीचा दहावीचा निकाल सोमवारी लागला असून त्या परीक्षेत ती ८५ टक्क्यांनी उत्तीर्ण झाली आहे.
जोगेश्वरी येथील बांद्रेकर वाडीतील शाळेत शिकणाऱ्या पूनम (नाव बदलले आहे) या १६ वर्षीय मुलीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. तिला लहानपणापासून ओळखणाऱ्या प्रतिक कुबल या २४ वर्षीय तरुणाने तिला पाच महिन्यांपूर्वीच फेसबूकवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर फेसबूक व व्हॉट्सअ‍ॅप यांवरील संभाषणाला तो प्रेम समजत तिच्याशी बोलत राहिला. ही बाब पूनमच्या पालकांना कळल्यावर त्यांनी त्याला विरोध केला होता. त्यानंतर तिने प्रतिकला नकार दिला होता.