मुंबई-ठाण्याबरोबरच आता राज्यातही डेंग्यूचा झपाटय़ाने फैलाव सुरू झाला असून आतापर्यंत राज्यभरात तब्बल पाच हजार ३०० संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. तर डेंग्यूबळींची संख्या २६ झाली आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान नवनियुक्त सरकारपुढे आहे. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
राज्यात शहरी भागात दोन हजार ६०० तर ग्रामीण भागात दोन हजार ७०० असे एकूण पाच हजार ३०० संशयित रुग्णांची नोंद विविध रुग्णालयांत झाली आहे. त्यातील २६ रुग्णांचा मृत्यू झाला असून निम्म्याहून अधिक मृत्यू पुणे व पिंपरी-चिंचवड भागात झाले आहेत. या दोन्ही भागांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढच होत असल्याचे तेथील पालिकांचे म्हणणे आहे. आजाराचा फैलाव रोखण्यासाठी पालिकांकडे पुरेसे मनुष्यबळही नाही. दरम्यान, मुंबई-ठाणे परिसरात डेंग्यूचा फैलाव होऊ लागला आहे. या पाश्र्वभूमीवर मुंबई पालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना डेंग्यूवर नियंत्रण आणण्यासाठी पालिका करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
जनजागृती मोहीम
डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी रेडिओवरील जाहिराती, रिक्षा- टॅक्सी, प्रचारफेरी यांच्या माध्यमांतून जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. त्यावर डेंग्यूबाबत जनजागृतीसाठी सोशल मीडियाचा मोठय़ा प्रमाणात वापर करा, घरातील पाण्याचे साठे नष्ट करण्यासाठी ‘ड्राय डे’, ‘पानी फेको’ यांसारखे अभियान राबवा, १४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या स्वच्छता अभियानामध्ये या उपक्रमांचा समावेश करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
डेंग्यूच्या थैमानाने मुंबईकर हैराण झालेले असतानाच स्वाइन फ्लू आजारानेही डोके वर काढले आहे. अंधेरीतील एका खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूमुळे गुरुवारी एकाचा मृत्यू झाला. वर्षभरात शहरात स्वाइन फ्लूचे ११ रुग्ण आढळले असून हा पहिलाच मृत्यू असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. डेंग्यूच्या थैमानाने मुंबईकर हैराण झालेले असतानाच स्वाइन फ्लू आजारानेही डोके वर काढले आहे. अंधेरीतील एका खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूमुळे गुरुवारी एकाचा मृत्यू झाला. वर्षभरात शहरात स्वाइन फ्लूचे ११ रुग्ण आढळले असून हा पहिलाच मृत्यू असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
*थंडी, ताप, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण येत असल्याने ५० वर्षीय रुग्णाला अंधेरी पूर्व येथील खासगी रुग्णालयात ३० ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आले होते.
*त्यापूर्वी पाच दिवस ही लक्षणे त्याला सुरू होती. रुग्णाची स्वाइन फ्लू चाचणी सकारात्मक आली. त्यानंतर त्याला टॅमी प्लू गोळ्या देण्यात आल्या. परंतु उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. त्यातच रुग्णाचा मृत्यू झाला.
*त्यातच या रुग्णाचा मृत्यू झाला. जानेवारीपासून आतापर्यंत शहरात स्वाइन फ्लूचे ११ रुग्ण आढळले असून स्वाइन फ्लूमुळे हा पहिलाच मृत्यू आहे.
ठाण्यातील शाळांमध्ये अतिदक्षतेचे आदेश
*ठाणे महापालिकेने शहरातील सर्व खासगी शाळांसाठी अतिदक्षतेचा इशारा दिला असून वर्ग सुरू होण्यापूर्वी डासांची उत्पत्तिस्थाने नष्ट करण्याचे फर्मान काढले आहे.
* डेंग्यूचा फैलाव करणारे डास साधारणपणे दिवसा चावा घेतात, असा महापालिकेच्या आरोग्य विभागाचा दावा आहे.
*आरोग्य विभागाने ठाण्यातील प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांचे एक सर्वेक्षण पूर्ण केले असून अशा शाळांना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कीटकनाश प्रभावहीन!
एकीकडे डेंग्यूच्या मृत्यूंमुळे घबराट पसरली असतानाच पालिका वापरत असलेले कीटकनाशकच प्रभावहीन असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. या कीटकनाशकाचा दर्जा योग्य नसल्याने पालिकेनेच संबंधित कंपनीला ६८ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र त्यानंतरही पुरवठा का सुरू ठेवण्यात आला, असा प्रश्न गटनेते मनोज कोटक यांनी मांडला.