आज आणि उद्या करिअर वाटांवर चर्चा; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेचे सनदी अधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन

विद्यार्थी आणि पालकांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या करिअर कार्यशाळेस आजपासून रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी येथे सुरुवात होत आहे.

मुंबई : विद्यार्थी आणि पालकांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या करिअर कार्यशाळेस आजपासून रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी येथे सुरुवात होत आहे. सनदी सेवेतील अभ्यासू अधिकारी निधी चौधरी (आयएएस) यांच्या हस्ते सकाळी १० वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.

करोनापश्चात करिअरचा नेमका वेध घेणे आणखीच कठीण झाले आहे. एकीकडे सनदी सेवा, सरकारी नोकरी भुरळ घालते तर दुसरीकडे सायबर लॉ, सोशल मीडिया, बायोटेक्नॉलॉजीसारख्या वेगळय़ा वाटा खुणावतात. मेडिकल, इंजिनीअिरग आणि स्पर्धा परीक्षांसारख्या करिअर पर्यायांची तयारी नेमकी कशी करायची, असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडतात. त्यावर थेट तज्ज्ञांकडून ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या करिअर कार्यशाळेत जाणून घेता येईल.

करिअरच्या वाटा शोधताना तरुणांना आकर्षित करणारा पर्याय म्हणजे सनदी सेवा. संघ लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांविषयी विद्यार्थ्यांना प्रचंड कुतूहल असते. या सनदी सेवांमधील उत्तम करिअर साकारणाऱ्या मुंबई उपनगर जिल्हाधिकारी, आयएएस निधी चौधरी तसेच आयपीएस डॉक्टर रवींद्र शिसवे, विशेष पोलीस महानिरीक्षक (महाराष्ट्र राज्य मानवी आयोग, मुंबई) हेसुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आज निधी चौधरी विद्यार्थ्यांशी संवाद साधतील तर उद्या २८ मे रोजी डॉक्टर रवींद्र शिसवे आपले अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडतील.

मुख्य प्रायोजक

गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ

करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट, मुंबई युनिव्हर्सिटी

सहप्रायोजक

विद्यालंकार क्लासेस, आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स, सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.

पॉवर्ड बाय

ठाकूर इन्स्टिटय़ूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी,  व्हिसिलग वुड्स इंटरनॅशनल, क्लासरूम एज्युटेक, सुविद्या इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी,  आर. ए. सी. यू. एस ग्रुप युनिव्हर्सिटीस फॉर मेडिकल अँड इंजिनिअरिंग अ‍ॅडमिशन्स

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Discuss career paths today tomorrow inauguration lok satta marg yashacha workshop nidhi chaudhary ysh

Next Story
आदेशाला स्थगिती मिळवा अन्यथा घर रिकामे करा ; वृद्ध आईच्या छळवणूकप्रकरणी न्यायालयाचे ६६ वर्षीय मुलाला आदेश
फोटो गॅलरी