चार आरोपींना अटक; शहरात नऊ ठिकाणी फसवणूक

मुंबई : कांदिवलीच्या हिरानंदानी हाईट्स गृहसंकुलातील लस घोटाळ्यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक के ली असून अन्य एका आरोपीस शुक्रवारी मध्य प्रदेशातून ताब्यात घेतले. या टोळीने शहरात नऊ ठिकाणी लसीकरण शिबिरांद्वारे नागरिकांना लाखो रुपयांना फसविल्याची माहिती उजेडात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या टोळीचा प्रमुख महेंद्रप्रताप सिंह दहावी नापास असून गेल्या काही वर्षांपासून मालाड येथील मेडिकल असोसिएशनमध्ये कार्यरत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. या टोळीत मालाड-कांदिवली परिसरात ‘नर्सिंग सेंटर’ चालविणारा बोगस डॉक्टर मनिष त्रिपाठी, कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयाच्या जनसंपर्क विभागात कार्यरत राजेश पांडे या दोन प्रमुख आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच आरोपींनी लसीकरणासाठी वापरलेल्या कु प्या अस्सल होत्या का? याबाबत तपास सुरू असल्याचे अतिरिक्त आयुक्त दिलीप सावंत यांनी सांगितले. कांदिवली पोलिसांनी आतापर्यंत के लेल्या तपासात टोळीने लसकु प्या वैध मार्गाने किं वा अधिकृत वितरकाकडून घेतलेल्या नाहीत, अशी माहितीही पुढे आल्याचेही त्यांनी सांगितले.

‘हिरानंदानी हाईट्स’च्या रहिवाशांपैकी एकाची पांडेशी ओळख होती. त्या रहिवाशाकरवी टोळीने या इमारतीत शिरकाव के ला. लसीकरणाच्या वेळी नागरिकांना तेथे लसकु प्यांची झाकणे उघडी असलेली आढळली. तसेच तेथे डॉक्टरही उपस्थित नव्हते. लस घेतल्यानंतर नागरिकांना ताप, अंगदुखी आदी लक्षणे आढळली नाही. त्यामुळे त्यांच्या मनात शंके ची पाल चुकचुकली. मात्र लस घेतल्याबद्दलचे प्रमाणपत्र त्यांच्या हाती पडले तेव्हा त्यांचा संशय खरा ठरला. प्रमाणपत्रावर भलत्याच रुग्णालयांची नावे होती. लसीकरणाची वेळ,तारिख, पत्ता आदी तपशीलही चुकलेले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गृहनिर्माण संस्थेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

पोलिसांनी याप्रकरणी महेद्रप्रतापसह संजय गुप्ता, चंदन सिंग उर्फ ललित आणि नितीन मोडे यांना अटक के ली. गुप्ता कार्यक्रम व्यवस्थापक (इव्हेंट मॅनेजर) असून त्याने लसीकरण शिबिरासाठी आवश्यक व्यवस्था पुरवली होती. चंदन आणि ललित एका रुग्णालयातील कर्मचारी असून त्यांनी कोकिलाबेन रुग्णालयाचा युजर आयडी, पासवर्ड मिळवून बनावट प्रमाणपत्रे तयार के ली. लस आणण्याची जबाबदारी असलेला आरोपी करिम अली याला मध्यप्रदेशातून ताब्यात घेतले आहे.

नागरिकही जबाबदार

नागरिकांची फसवणूक झाली असली तरी त्यांनीही जबाबदारी चोखपणे पार पाडलेली नाही, अशी प्रतिक्रि या तपासाशी संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्याने नोंदवली. महापालिके ने परवानगी दिली असली तरी शिबिर आयोजित करण्यापूर्वी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी खातरजमा करणे आवश्यक होते. ती त्यांनी केली नाही. त्यामुळे तेही या गुन्ह्यात अप्रत्यक्षपणे सामील आहेत, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट के ले.

 

चित्रपट कंपन्यांतही…

याच टोळीने वांद्रे पश्चिाम येथील ‘टिप्स इंडस्ट्रिज लिमिटेड’ आणि अंधेरी येथील ‘मॅचबॉक्स पिक्चर्स’ या दोन कं पन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण शिबिर आयोजित के ले होते. हे शिबिर आरोपी संजय गुप्ता याच्या ए. पी. इव्हेन्ट्स कं पनीने आयोजित के ले होते. कांदिवली प्रकरणात गुप्ताचे नाव पुढे येताच टीप्स आणि मॅचबॉक्स कं पन्यांनी खार, वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रारी के ल्या. टीप्स कं पनीतील ३६५ आणि मॅचबॉक्स कं पनीतील १५१ जणांनी लस घेतली. त्यासाठी प्रत्येकी १२५० रुपये आकारण्यात आले होते. ही दोन्ही शिबिरे कोकिलाबेन रुग्णालयाच्या नावे आयोजित के ली गेली, असे वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सिराज इनामदार यांनी सांगितले. दरम्यान, या दोन्ही कंपन्यांनी लसीकरण शिबिर आयोजित करण्याआधी पालिकेच्या विभागांना माहिती दिलेली नाही, असे वांद्रे पश्चिाम विभागाचे साहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी सांगितले.

कोकिळाबेन रुग्णालयाचे म्हणणे…

रुग्णालयातील कर्मचारी राजेश पांडे याने रुग्णालयाचे प्रतिनिधी असल्याचे सांगून रुग्णालयाच्या नावाचा गैरवापर करून लसीकरण शिबिरे घेतली आहेत. त्याने आयोजित केलेल्या लसीकरण शिबिरांविषयी रुग्णालयाला कोणतीही माहिती दिलेली नाही. तसेच यासाठी रुग्णालयातील कर्मचारी किंवा अन्य सामग्रीचा वापर केलेला नाही. कोकिळाबेन रुग्णालयातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या लसीकरण शिबिरांमध्ये राजेश पांडे याचा सहभागही नाही. राजेश पांडे याला रुग्णालयातून बडतर्फ करण्यात आल्याचे कोकिळाबेन रुग्णालयाने स्पष्ट केले.

झाले काय? एका अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिलेल्या माहितीनुसार पांडे लसीकरणासाठी इच्छुक गृहसंकु ले, गृहनिर्माण संस्थांना गाठून कोकिलाबेन रुग्णालयामार्फत लसीकरण होईल, असे सांगत असे. संस्था लसीकरण शिबिर घेण्यास तयार झाल्यावर तो महेंद्रप्रतापशी संपर्क साधत असे. महेंद्रप्रताप अन्य आरोपींकरवी शिबिराचे आयोजन, आवश्यक मनुष्यबळ, लसमात्रा आणि प्रमाणपत्र यांची व्यवस्था करीत असे. बोगस डॉक्टर त्रिपाठी याच्या नर्सिंग सेंटरमधील विद्यार्थिनी नागरिकांना लस टोचत असत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doctors and hospital staff in vaccine scam akp