दिवंगत कवी नामदेव ढसाळ यांच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने १५ जानेवारी रोजी नामदेव ढसाळ स्मृती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
ढसाळ यांच्यावरील छायाचित्रांचे प्रदर्शन ‘सारे काही समष्टीसाठी’ या शीर्षकाअंतर्गत होणार असून सुधाकर ओलवे यांनी काढलेली छायाचित्रे प्रदर्शनात पाहायला मिळतील. हे प्रदर्शन रवींद्र नाटय़ मंदिर, कलांगण येथे दुपारी १२ ते रात्री ९ या वेळेत सर्वासाठी खुले आहे, तर ‘ढसाळपुरा’ हे भित्तिचित्र प्रदर्शन प्रभादेवी येथील भूपेश गुप्ता भवन, लोकवाङ्मय गृह येथे आयोजित करण्यात आले आहे.
दुपारी ३ ते ४ या वेळेत पु. ल. देशपांडे कला अकादमीतील मिनी थिएटर येथे ‘तुझे बोट धरून चाललो आहे’ हा दीर्घाक, तर दुपारी ४ ते ५ या वेळेत ‘गांडू बगीचा’ ही एकांकिका सादर होईल. सायंकाळी ५.४५ ते ६.१५ या वेळेत रवींद्र नाटय़ मंदिर येथे ‘ढसाळगीते’, ६.१५ ते ६.४५ या वेळेत ‘जलसा’, ६.४५ ते ७ या वेळेत ‘उंदीर बिळात आहे’ हे भारूड सादर होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Event on namdeo dhasal memorial