मुंबई : हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’ आणि ‘वाळवी’ या तीन मराठी चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कारांची हॅटट्रिक साधणाऱ्या दिग्दर्शक परेश मोकाशी आणि निर्माती मधुगंधा कुलकर्णी यांच्या ‘मु. पो. बोंबिलवाडी’ या आगामी विनोदी चित्रपटाची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून या चित्रपटात हिटलरची भूमिका कोण करणार? याविषयी रसिकांमध्ये उत्सूकता होती. विनोदाचे बादशाह प्रशांत दामले ही भूमिका साकारणार असल्याचे चित्रपटाच्या निर्मात्यांनी बुधवारी जाहीर केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘कोण होणार हिटलर?’ या समाज माध्यमावर चर्चित असणाऱ्या प्रश्नाचे उत्तर अखेर लेखक, दिग्दर्शक परेश मोकाशी, निर्माते मधुगंधा कुलकर्णी आणि विवेक फिल्म्स, मयसभा करमणूक मंडळी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिले. यावेळी अभिनेते प्रशांत दामले, वैभव मांगले, प्रणव रावराणे, मनमीत पेम, सुनील अभ्यंकर, गीतांजली कुलकर्णी, रितिका श्रोत्री, अद्वैत दादरकर आदी मंडळी उपस्थित होती.

हेही वाचा – मोटरगाडीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

हेही वाचा – दुसऱ्या दिवशीही पथकराचा गोंधळ कायम, फास्टॅगमधून पैसे कापल्याचे संदेश, मार्गिकांच्या गोंधळामुळे वाहतूक कोंडी

‘मुळात हिटलर म्हटले की आपल्या डोळ्यासमोर एक भयानक चेहरा येतो. मी माझ्या आयुष्यात असा हिटलर केला नाही आणि करणारही नाही. हे जे पात्र आहे त्याला हिटलर का म्हणावे हा प्रश्न पडावा असे हे पात्र आहे. मी दिग्दर्शकाचा अभिनेता आहे, त्यामुळे दिग्दर्शक जे सांगतो ते मी पडद्यावर किंवा रंगभूमीवर सादर करण्याचा प्रयत्न करतो’ असे सांगतानाच माझी हिटलर म्हणून झालेली निवड मलाच विनोदी वाटते असे मत अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले.हिटलरच्या निवडीबाबत बोलताना लेखक-दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणाले, “या चित्रपटात हिटलर कसा असावा याबाबत चर्चा सुरू होती. हिटलर म्हणजे क्रूर, जगज्जेता, कठोर अशी त्याची प्रतिमा आहे. पण नाटकाचा विनोदी बाज पाहता, आमचा हिटलर गोंडस असावा असा आमचा प्रयत्न होता. आता गोंडस हिटलर कोण? असा प्रश्न आल्यावर एकाच नाव पुढे आले आणि ते म्हणजे प्रशांत दामले”.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famous actor prashant damle as hitler paresh mokashi mu po bombilwadi found hitler mumbai print news ssb