मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडी अर्थातच सक्तवसुली संचालनालयाकडून समन्स जारी करण्यात आला आहे. त्यांना ५ जुलै रोजी साडे अकरा वाजता चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता संजय पांडे यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. तीन दिवसांपूर्वीच संजय पांडे हे सेवानिवृत्त झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी एका जुन्या प्रकरणाचा ईडीकडून तपास सुरू असताना मुंबईचे माजी आयुक्त संजय पांडे यांचं नाव समोर आलं आहे. याच पार्श्वभूमीवर ईडीने त्यांना चौकशीसाठी समन्स जारी केला आहे. ५ जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.

३० जून रोजी ते सेवानिवृत्त झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी त्यांना ईडीकडून समन्स जारी करण्यात आला आहे. नेमक्या कोणत्या प्रकरणात ईडीकडून समन्स जारी करण्यात आला आहे, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकली नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former mumbai police commissioner sanjay pandey summoned by ed order to appear for interrogation on july 5 rmm
First published on: 03-07-2022 at 18:40 IST