कांदिवली येथे राहणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर अतिप्रसंग करत तिला जाळल्याची धक्कादायक घटना रविवारी उजेडात आली. याप्रकरणी मालाड पोलिसांनी मोहम्मद सिद्दिकी (२८) या तरुणाला अटक केली असून त्याला २८ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे.
संबंधित तरुणी कांदिवली पश्चिमेत भावंडांसोबत राहात होती. ती घरात एकटी असल्याचे हेरून सिद्दिकी तिच्या घरात घुसला. त्याने तरुणीवर अतिप्रसंग केला. संबंधित तरुणीने घराबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला असता सिद्दिकीने तिला पेटवून देत घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, या प्रसंगाची माहिती तरुणीचा भाऊ मोहम्मद शेख याला समजली. मात्र, नोकरीचे ठिकाण घरापासून लांब असल्याने त्याने मोठय़ा बहिणीच्या पतीला दूरध्वनी करून घराला आग लागल्याची माहिती कळवत तातडीने घरी पोहोचण्यास सांगितले. त्यानंतर शेखची बहीण व तिचा पती कांदिवली येथील घरी पोहोचले असता त्यांना संबंधित तरुणी जळालेल्या अवस्थेत आढळली. त्यांनी तिला तातडीने कांदिवलीतील बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान संबंधित तरुणीने एका अज्ञात व्यक्तीने आपल्यावर अतिप्रसंग करून जाळल्याचे भाऊ मोहम्मद शेख याला सांगितले. त्यानंतर उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला. शेख यांनी याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे सिद्दिकी याला अटक केली.
संग्रहित लेख, दिनांक 21st Dec 2015 रोजी प्रकाशित
अतिप्रसंग करून तरुणीला जाळले
दरम्यान, या प्रसंगाची माहिती तरुणीचा भाऊ मोहम्मद शेख याला समजली.
Written by मंदार गुरव
Updated:
First published on: 21-12-2015 at 00:22 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl burned in mumbai