सव्वा कोटी रुपयांचे सोने, परदेशी चलनाची तस्करी; तिघांना अटक

सुदानमधील नागरिक शारजामार्गे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई : सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर केलेल्या दोन कारवायांमध्ये एक किलो ८०० ग्रॅम सोने व ६० हजार अमेरिकन डॉलर जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सव्वा कोटी रुपये असून याप्रकरणी सुदान देशाच्या नागरिकासह तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. 

सुदानमधील नागरिक शारजामार्गे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. ग्रीन चॅनेलच्या पुढे गेल्यानंतर संशयावरून त्यांच्याकडील दोन बॅगांची झडती घेण्यात आली. त्यात त्याच्याकडे एक किलो ८६१ ग्रॅम वजनाचे सोने सापडले. हे सोने पावडर स्वरूपात होते. त्याच्या पुड्या तयार करून स्टिकरमध्ये लवपण्यात आल्या होत्या. आणखी एका कारवाईत व्हीलचेअर बनवणाऱ्या कंपनीचा कर्मचारी सीमाशुल्क विभागाच्या जाळ्यात अडकला. त्याच्याकडून ४४ लाख १६ हजार रुपयांचे परदेशी चलन जप्त करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gold worth rs smuggling of foreign currency three arrested akp

Next Story
‘मत’प्रेरित अल्पदृष्टी की दीर्घोद्देशी कठोर निग्रह?; ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमातून अर्थसंकल्पाचा वेध
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी