सनदी सेवेतील संधींबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेच्या निधी चौधरी उद्घाटक

करिअरच्या वाटा शोधताना तरुणाईला भुरळ घालणारा पर्याय म्हणजे सनदी सेवा. केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोगासह स्पर्धा परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना प्रचंड कुतूहल असते.

मुंबई : करिअरच्या वाटा शोधताना तरुणाईला भुरळ घालणारा पर्याय म्हणजे सनदी सेवा. केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोगासह स्पर्धा परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना प्रचंड कुतूहल असते. त्यांना याबाबत मुंबई उपनगर जिल्हाधिकारी, आयएएस निधी चौधरी या २७ मे रोजी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’मध्ये उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करतील़ 

  वैद्यकीय, अभियंता, स्पर्धा परीक्षा आणि करिअरच्या इतर वाटांबाबत तज्ज्ञ ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. अगदी समाजमाध्यम, सायबर लॉ, बायोटेक्नॉलॉजी अशा वेगळय़ा वाटांवरच्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी नेमकी कशा तयारी करायला हवी, याची माहिती या कार्यक्रमातून मिळेल.

या करिअर कार्यशाळेत दोन्ही दिवशी सारखेच विषय असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक आपल्या सवडीने तारीख निवडू शकतात. कार्यक्रमासाठी नोंदणी आवश्यक आहे. तसेच ऑनलाइनबरोबरच ऑफलाइन नोंदणीही आता करू शकता. रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी येथे स. ९ ते १२ आणि  सं. ५ ते ८ या वेळात प्रवेशिका उपलब्ध आहेत. 

मुख्य प्रायोजक

गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट, मुंबई युनिव्हर्सिटी

सहप्रायोजक

विद्यालंकार क्लासेस, आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स, सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.

पॉवर्ड बाय

ठाकूर इन्स्टिटय़ूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी,  व्हिसिलग वुड्स इंटरनॅशनल, क्लासरूम एज्युटेक, सुविद्या इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी,  आर. ए. सी. यू. एस ग्रुप युनिव्हर्सिटीस फॉर मेडिकल अँड इंजिनिअिरग अ‍ॅडमिशन्स

तज्ज्ञांकडून मार्गदर्शन 

  • डॉ. श्रीराम गीत (ज्येष्ठ करिअर समुपदेशक)
  • विवेक वेलणकर (ज्येष्ठ करिअर मार्गदर्शक)
  • डॉ. हरिश शेट्टी (मानसोपचारतज्ज्ञ)
  • डॉ. राजेंद्र बर्वे (मनोविकारतज्ज्ञ)
  • डॉ. सिद्धिविनायक बर्वे (बायोटेक्नॉलॉजी विषयातील तज्ज्ञ अभ्यासक, संशोधक)
  • युवराज नरवणकर (वकील, मुंबई उच्च न्यायालय)
  • सारंग साठय़े (भारतीय डिजिटल पार्टी)
  • केतन जोशी (समाजमाध्यम विश्लेषक आणि अभ्यासक)

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Guidance opportunities chartered service inaugurates workshop lok satta marg yashacha ysh

Next Story
विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी