‘त्या’ रात्री आपण ना गाडी चालवत होतो ना आपल्या गाडीचा वेग मर्यादेपेक्षा अधिक होता, परंतु आपल्याला या अपघात प्रकरणात गोवण्यासाठी खोटा पुरावा सादर करण्यात आलेला आहे आणि आपल्या अंगरक्षकाने खोटी साक्ष दिल्याचा दावा अभिनेता सलमान खान याच्या वतीने शुक्रवारी अंतिम युक्तिवादाच्या वेळेस करण्यात आला. रवींद्र पाटील या सलमानच्या अंगरक्षकाने या प्रकरणी सलमानने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून अपघात केल्याची तक्रार नोंदवली होती व तो या खटल्यातील मुख्य साक्षीदार होता. मात्र २००७ मध्ये त्याचा मृत्यू झाला होता. सलमानवरील सदोष मनुष्यवधाच्या आरोपाअंतर्गतील खटल्यात सध्या अंतिम युक्तिवाद सुरू आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hit and run case salman says he was not driving