शहरातील जांभळी नाका येथील भावना हॉटेलला शनिवारी दुपारी आग लागली. महापालिका अग्निशमन दलाने तातडीने धाव घेऊन आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झाली नाही. या आगीमुळे परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.