परमिट रुम आणि मद्यविक्री दुकानांच्या परवानाशुल्कात वाढ करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाविरोधात हॉटेल अॅण्ड रेस्टॉरन्ट असोसिएशन ऑफ परवाना शुल्कवाढीला विरोध
वेस्टर्न इंडिया (एचआरएडब्ल्यूआय)ने उच्च न्यायालयात धाव घेतली़
सरकारने परमिट रुम व मद्यविक्री दुकानांच्या परवाना शुल्कात ५० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परमिट रुमचे परवाना शुल्क ३.६६ लाख रुपयांवरून ५.४४ लाख, तर मद्यविक्रीच्या दुकानाचे परवाना शुल्क ९५ हजार रुपयांवरुन १.५० लाखांवर जाणार आहे. हॉटेल्सकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असा ३८ टक्के कर भरण्यात येतो. आता ही परवाना शुल्कातील वाढीमुळे व्यावसायिकांचा कणाच मोडेल, अशी भीती ‘एचआरएडब्ल्यूआय’ने व्यक्त केली आहे. शुल्कवाढीचा फेरविचार करण्याच्या विनंतीबाबत सरकारकडून अपेक्षाभंग झाल्यामुळे ‘एचआरएडब्ल्यूआय’ने याचिका दाखल केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Mar 2014 रोजी प्रकाशित
हॉटेल व्यावसायिकांची न्यायालयात धाव
परमिट रुम आणि मद्यविक्री दुकानांच्या परवानाशुल्कात वाढ करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाविरोधात हॉटेल अॅण्ड रेस्टॉरन्ट असोसिएशन ऑफ परवाना शुल्कवाढीला विरोध वेस्टर्न इंडिया (एचआरएडब्ल्यूआय)ने उच्च न्यायालयात धाव घेतली़

First published on: 23-03-2014 at 05:25 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hotel owners runs to court