राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादीचे बिनीचे नेते छगन भुजबळ यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापे टाकल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण योग्यवेळी या विषयावर बोलू, असे म्हटले आहे.
महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून वेगाने तपास करण्यात येतो आहे. गेल्या आठवड्यात छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छगन भुजबळांच्या मुंबई, पुणे, नाशिक, मनमाड आणि येवल्यातील विविध घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले. या कारवाई संदर्भात प्रतिक्रिया विचारल्यावर शरद पवार म्हणाले, सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. काल काही ठिकाणी कारवाई करण्यात आली. आजही तपास सुरू आहे. त्यामुळे मी आत्ता या विषयावर काही बोलणे योग्य ठरणार नाही. मी आत्ता काही बोललो तर उद्या परत तपासावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, असा आरोप माझ्यावर कोणीतरी करेल. त्यामुळे मला जे काही सांगायचे आहे, ते मी योग्यवेळी सांगेन.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jun 2015 रोजी प्रकाशित
भुजबळांसंदर्भात योग्यवेळी बोलेन – शरद पवार
मी आत्ता काही बोललो तर उद्या परत तपासावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, असा आरोप माझ्यावर कोणीतरी करेल.

First published on: 17-06-2015 at 03:12 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I will give my reaction on right time about case against chhagan bhujbal says sharad pawar