Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

छगन भुजबळ

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर, १९४७ रोजी नाशिकमध्ये झाला. त्यांनी मुंबईमधील एका अभियांत्रिकी विद्यालयामधून मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी मिळवली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ते शेती व त्याच्याशी संबंधित व्यवसाय करत होते. त्यांना लहानपणापासून राजकारणामध्ये रुची होती. शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश करत त्यांनी राजकारणामध्ये पदार्पण केले.

१९७३ मध्ये ते मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. पुढे १९९१ साली त्यांनी शिवसेना (Shivsena) सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ते शरद पवारांचे निकटवर्तीय आहेत. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर भुजबळ यांनी पुन्हा पक्षांतर केले. माझगाव मतदारसंघातून ते १९८५ आणि १९९० या वर्षांमध्ये निवडून आले आहेत. येवला मतदारसंघातून निवडून येत त्यांना विधानसभेचे सदस्यत्व मिळाले. १९९९ ते २००३ या काळामध्ये त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दोन पदांची जबाबदारी होती. २००४ मध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री बनले.

२००८ ते २०१० या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद होते. महाराष्ट्र सदन घोटाळा व मनी लॉंडरिंग प्रकरणी छगन भुजबळ यांना १४ मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांचा जामीन मंजूर झाला. महाविकास आघाडी सरकार असताना अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार या विभागाचे ते मंत्री होते.
Read More
Manoj Jarange On Chhagan Bhujbal
Manoj Jarange On Chhagan Bhujbal : मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना इशारा; म्हणाले, “मी आता येवल्यात जाऊन…”

मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांना इशारा देत आपण येवल्यामध्ये येऊन उपोषण करु शकतो, असा इशारा दिला आहे.

Sanjay Raut on Sharad Pawar
Sanjay Raut on Sharad Pawar : “शरद पवार मोठे नटसम्राट, तर भुजबळ…”, संजय राऊत यांचा खोचक टोला कुणाला?

Sanjay Raut on Sharad Pawar : अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर त्याचे पडसाद राज्याच्या…

Sharad Pawar On Chhagan Bhujbal
“बारामतीच्या भाषणात माझं प्रचंड कौतुक…”, शरद पवारांचा छगन भुजबळांना खोचक टोला

मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यावर आता शरद पवारांनी पुण्यात पत्रकार परिषदेत भाष्य केलं.

NCP Sharadchandra Pawar party chief Sharad Pawar talk about Chhagan Bhujbal
Sharad Pawar on Chhagan Bhujbal: “भुजबळांनी मार्गदर्शन केलं”; शरद पवारांचं मिश्कील भाष्य

मराठा आरक्षणासंदर्भा सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधक उपस्थित नव्हते. त्यावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बारामतीत झालेल्या…

Abdul Sattar On Chhagan Bhujbal
“…तर आम्ही खपवून घेणार नाही”, मंत्री अब्दुल सत्तार यांचा कोणाला इशारा?

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत कोणी बोलत असेल तर आमच्यासारखा कार्यकर्ता खपून घेणार नाही”, असं मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

Chhagan Bhujbal f
OBC Reservation : “…तर मी राजीनामा देईन”, छगन भुजबळ असं का म्हणाले? ओबीसी आरक्षणाबाबत म्हणाले…

OBC Reservation Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणाले, राज्यातलं वातावरण सध्या अस्थिर असल्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित बसून आपलं राज्य कसं…

chhagan Bhujbal sharad pawar
आरक्षण वादावर शरद पवार यांचा मोजक्या नेत्यांशी चर्चेचा पर्याय, छगन भुजबळांची माहिती

सर्वपक्षीय बैठकीत ५० ते ६० नेते उपस्थित असतात. नाजूक प्रश्नावर चर्चा कशी करणार, असा प्रश्न पवार यांनी केला.

Chhagan Bhujbal told old story of meeting with Balasaheb Thackeray
Chhagan Bhujbal:”बाळासाहेबांनी मला घरी भेटायला बोलवलं तेव्हा…”; छगन भुजबळांनी सांगितला किस्सा

काल (15 जुलै) छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची काल भेट घेतली. या भेटीची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली. आता…

political parties, chhagan bhujbal, Maratha reservation, maratha community
छगन भुजबळ नेमके कोणाचे? मराठा समाजाच्या नाराजीमुळे राजकीय पक्षांना नकोसे झाल्याची चर्चा प्रीमियम स्टोरी

निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाची नाराजी परवडणारी नसल्याने कोणत्याच राजकीय पक्षाला आता छगन भुजबळ हे नकोसे झाल्याची चर्चा आहे.

Chhagan Bhujbal Post All Meeting Points
छगन भुजबळ यांची पोस्ट, “शरद पवार लवकरच राज्यातील वातावरण…” फ्रीमियम स्टोरी

छगन भुजबळ यांनी बारामतीत शरद पवारांवर टीका केली होती, त्यानंतर तातडीने सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.…

Anil Deshmukh sharad pawar chhagan bhujbal
Chhagan Bhujbal : “भुजबळांनी परतीचे प्रयत्न केले…”, अनिल देशमुखांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “त्यांची दुटप्पी भूमिका…”

Chhagan Bhujbal Meets Sharad Pawar For OBC Reservatin : या भेटीमुळे छगन भुजबळ स्वगृही परतणार आहेत का? असा प्रश्न उपस्थित…

संबंधित बातम्या