रवींद्र नाटय़ मंदिरात बुधवारी  पारितोषिक वितरण सोहळा रंगणार
‘लोकसत्ता’ गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा ही मुंबईच्या सांस्कृतिक भावविश्वाचा अविभाज्य भाग आहे, हे पुन्हा एकदा सिद्घ झाले आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही स्पध्रेला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्तम प्रतिसाद दिला. मुंबई शहरासह मध्य-पश्चिम उपनगरांमध्ये आणि नवी मुंबई या ठिकाणी ही स्पर्धा नुकतीच पार पडली. यात कुलाबा ते अंधेरी, जोगेश्वरी ते दहिसर, ठाणे शहर, छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मुलुंड, डोंबिवली-कल्याण आणि नवी मुंबई अशा सहा विभागांचा समावेश होता. स्पर्धेतील विभागवार वेगवेगळ्या गटांतील पारितोषिके आणि ‘मुंबईचा राजा’साठीची नामांकने जाहीर करण्यात आली असून स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा बुधवार ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर येथे रंगणार आहे.
स्पध्रेचे मुख्य प्रायोजक ‘वीणा वर्ल्ड’ तर सहप्रायोजक भारतीय आयुर्वमिा महामंडळ असून ‘बादशाहा’, ‘इंडियन ऑइल’, ‘अतुल ऑटो’ यांचेही प्रयोजकत्व लाभले आहे. ‘डीएनएस बँक’ ही स्पध्रेची बँकिंग पार्टनर, तर ‘रेड एफएम’ हे रेडिओ पार्टनर आहेत.
यंदाच्या गणेश उत्सव मूर्ती स्पर्धेत शहर व उपनगारीतील नामांकित मंडळांसह अन्य छोटी मंडळे सहभागी झाली होती. गणेशमूर्ती, सजावट, सजावटीच्या विषयातील वेगळेपणा, देखावा, संहिता लेखन, कला दिग्दर्शन, आदींबाबतचे वैविध्य पाहायला मिळाले. विविध मंडळांची सजावट व देखावे पाहण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती. स्थानिक कलावंतांनाही आपली कला सादर करण्यासाठी या स्पर्धेच्या निमित्ताने वाव मिळाला. मंडळाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. समाजातील समस्या, सद्य राजकीय परिस्थिती सामाजिक जाणीव आणि दुष्काळ अशा ज्वलंत विषयांना अधोरेखित करणारे वैविध्यपूर्ण विषयांवरील देखावे स्पर्धेत दिसून आले.
यात डिलाईल रोड येथील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाने नेत्रदानाचा प्रसार व्हावा यासाठी, दृष्टिहीन कलावंतांकडून गणेश उत्सवाची सजावट करून घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार डोळ्यांना दिसत नसूनही तीन गुणी अंध कलावंतांनी अंत:चक्षूने सजावट साकारली होती. कागदाच्या विविधरंगी आकारांतून तयार केलेले विविध प्रकार तसेच वेगवेगळ्या वाद्यांचा वापर यात करण्यात आला होता. गणपतीची विविध नावेही येथे ‘ब्रेल लिपी’च्या माध्यमातून तयार करण्यात आली होती. त्यामुळे ही सजावट अंध व्यक्ती आणि अन्य डोळसांसाठीही लक्ष वेधून घेणारी ठरली.
नवी मुंबईच्या तुभ्रे येथील शिवछाया मित्रमंडळाने आरशांचा कल्पक उपयोग करून स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण आणि निर्गसाची विविध प्रतिबिंबे गणेशभक्तांसमोर सादर केली. ‘आजच्या संकल्पात, उद्याचे प्रतिबिंब असते’, हा संदेश या मंडळाने देखाव्याच्या रूपाने दिला. तर दुसरीकडे केवळ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा या विषयाला अधोरेखित न करता या मंडळाने शेतकऱ्यांसाठी एक लाख रुपयांचा निधी जमा केला.
याशिवाय दहिसर आणि डोंबिवलीच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही सामाजिक विषयाचा आधार घेऊन त्याचे महत्त्व विशद केले होते. डोंबिवलीच्या अष्टविनायक सार्वजनिक मंडळाने ‘बालमजुरी’ कायमची बंद व्हावी यासाठी देखाव्याच्या रूपाने गणेशाकडे साकडे घातले. तर दहिसरच्या कोकणीपाडा येथील नवतरुण मित्र मंडळाने सार्वजनिक गणेशोत्सवाचे खालावत चाललेले स्वरूप आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा यावर बोट ठेवणारी पाच मिनिटांची संहिता सादर करण्यात येत होती. यात स्थानिक कलावंत सहभागी झाले होते.
ठाण्याच्या श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळाने शिक्षण आणि नोकरीसाठी परदेशी वास्तव्य करणाऱ्या मुलांच्या (ब्रेन ड्रेन) प्रश्नाची देखाव्यासाठी निवड करून आपले सामाजिक भान सिद्ध केले. सुबक गणेशमूर्ती, भव्य आणि नेत्रदीपक देखावा यामुळे ही सजावट पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. अंधेरीच्या स्वप्नाक्षय मित्र मंडळाने ‘मुंबई मेरी जान’ हा विषय घेऊन मुंबईतील मुख्य स्थळांचे दर्शन घडवले. अतिशय मर्यादित जागेत केलेली ही सजावट लक्षवेधक ठरली.

‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धे’च्या प्राथमिक फेरीसाठी खालील मंडळींनी परीक्षक म्हणून काम पाहिले
रमेश परब, संगीता टेमकर, योगेंद्र खातू, चंद्रशेखर, शिवाजी गावडे, सतेंद्र म्हात्रे, संदेश भंडारे, केदार सधाळे,राज गुहागरकर, दिलीप नाखवा, शौभा मोहनदास, राज चौगुले, मनोज वराडे, स्वाती गावडे, दीपक जगदंब, शरद काळे, अजित आचार्य, संदीप राऊत, कमलाकर राऊत, जयंत मयेकर, किशोर नाखवा, विलास गुर्जर, सचिन मंडलिक, संदेश पाटील, राजेंद्र पाटील, डॉ. विवेक भोसले, गणेश जोशी, अमोल पाटील, विठ्ठल चौहान, क्रांती सरवणकर, रूपेंद्र राजपूत, मोहन सोनार, सतीश वाघ, प्रकाश माळी, दिनकर गमरे, प्रवीण जुमादे, सोनल पवार, संदीप गमरे.

अंतिम फेरीचे परीक्षक
प्रसाद तारकर, प्रकाश भिसे, रवी मिश्रा, प्रकाश बडेकर, सुरेश राऊत, संतोष कुमार खांडगे, विनय कुलकर्णी, प्रशांत दीक्षित, क्रिसना पाटील, विवेक टेटवेविकर.

महाअंतिम फेरीतील परीक्षक
प्रकाश भिसे, अनिल नाईक

पारितोषिक वितरण कार्यक्रम
कधी – बुधवार, ३० सप्टेंबर २०१५
कुठे – रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी.
वेळ – संध्या : ६.३० वा.
खास आकर्षण – ‘जीवनगाणी’ यांचा ‘दयाघना गजानना’ हा कार्यक्रम
प्रवेशिका – रवींद्र नाटय़ मंदिर येथे उपलब्ध.

नामांकन

मुंबईचा राजा कोण?
भव्य पारितोषिक रु़ ५१,००१/-रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र
* स्वप्नाक्षय मित्र मंडळ, सार्व. गणेशोत्सव मॉडेल टाउन, अंधेरी (प.)
* पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ, डिलाईल रोड
* श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ, ठाणे</p>

विशेष पारितोषिक – पर्यावरणस्नेही सजावट
पारितोषिक रु. १५००१/-रोख,
मानचिन्ह व सन्मानपत्र
* पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ, डिलाईल रोड
* रुस्तम रहिवासी गणेशोत्सव मंडळ, लोअर परळ
* ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, माझगाव

विभागवार प्रथम पारितोषिक
पारितोषिक रु. १५००१/-रोख,
मानचिन्ह व सन्मानपत्र
विभाग : कुलाबा ते अंधेरी
* स्वप्नाक्षय मित्र मंडळ, सार्व. गणेशोत्सव मॉडेल टाउन, अंधेरी (पश्चिम)
* बाळ गोपाळ मित्र मंडळ, विलेपार्ले (पूर्व)
विभाग : जोगेश्वरी ते दहिसर
* जय हनुमान सेवा समिती, दहिसर (पूर्व)
* नवतरुण मित्र मंडळ, दहिसर (पूर्व)
विभाग : छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मुलुंड
* पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ, डिलाईल रोड
* ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, माझगाव
विभाग : ठाणे शहर
* हाजुरी उत्कर्ष मंडळ, ठाणे (प.)
* श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ, ठाणे
विभाग : डोंबिवली-कल्याण
* अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, डोंबिवली (पश्चिम)
* एव्हरेस्ट सेल्वा गणेश मित्र मंडळ, डोंबिवली (पश्चिम)
विभाग : नवी मुंबई विभाग
* नवयुग उत्सव मित्र मंडळ, एल.आय.जी.चा राजा
* शिवछाया मित्र मंडळ, तुर्भे

सवरेत्कृष्ट कला दिग्दर्शन
रु. २,५०१/- रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र
विभाग : कुलाबा ते अंधेरी
* मोहम्मद अयुब शाह- स्वप्नाक्षय मित्र मंडळ, सार्व. गणेशोत्सव मॉडेल टाउन, अंधेरी (प.)
* सचिन शेट्टी / मकरंद पांचाळ, रुस्तम रहिवासी गणेशोत्सव मंडळ, लोअर परळ
विभाग : जोगेश्वरी ते दहिसर
* प्रदीप वाळकर, सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिर, दहिसर (प.)
* गोविंद प्रसाद- जय हनुमान सेवा समिती, दहिसर (पूर्व)
विभाग : छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मुलुंड
* स्वप्निल नाईक- ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, माझगाव
* प्रदीप पंडित- पंगेरी चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (राणीबागचा राजा) भायखळा
विभाग : ठाणे शहर
* प्रमोद सावंत- श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ (ठाणे)
* जगदीश भोईर- एकवीरा मित्र मंडळ, ठाणे (प.)
विभाग : डोंबिवली-कल्याण
*अभिशेष ननावरे- एव्हरेस्ट सेल्वा गणेश मित्र मंडळ, डोंबिवली
* संतोष पाष्टे- दूधनाका गणेशप्रेमी मंडळ (कल्याण)
विभाग : नवी मुंबई
* नीलेश चौधरी- शिवछाया मित्र मंडळ, तुर्भे
* प्रसन्न कारखानीस/यशवंत पाटील- सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर- १७, वाशी

सवरेत्कृष्ट मूर्तिकार
रु. २,५०१/- रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र
विभाग : कुलाबा ते अंधेरी
* सागर चितळे- श्री बालमित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, विलेपाल्र्याचा गणराज, विलेपार्ले (पूर्व)
* मोहन जाधव- बाळ गोपाळ मित्र मंडळ, विलेपाल्र्याचा पेशवा
विभाग : जोगेश्वरी ते दहिसर
* भाबल बंधू- श्री साईदर्शन मित्र मंडळ, बोरिवली (पश्चिम)
* विजय खोत- नवशक्ती मित्र मंडळ, गोराई (२) बोरिवली (पश्चिम)
विभाग : छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मुलुंड
* बाबी बांदेकर- गणेश नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, घाटकोपर (पश्चिम)
* राकेश घोष्टेकर- पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ, डिलाईल रोड
विभाग : ठाणे शहर
* अशोक खरविले- हाजुरी उत्कर्ष मंडळ ठाणे (पश्चिम)
* सुनील वायकर- ओम शक्ती विनायक मित्र मंडळ, ठाणे (पूर्व)
विभाग : डोंबिवली-कल्याण
* अभिषेक बैकर- जागृती मित्र मंडळ, कल्याण (पश्चिम)
* राजन खातू- अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, डोंबिवली (पश्चिम)
विभाग : नवी मुंबई
* सीवूड्स राजा सार्वजनिक गणेशोत्सव आयोजित सीवूड्स रेसिडन्स वेल्फेअर असोसिएशन्स, नेरुळ
* विलास त्रिंबकर- सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सेक्टर ४-५ वाशी

सवरेत्कृष्ट संहिता लेखन
विशेष पारितोषिक विजेत्यांना मिळणार आहेत
रु. २,५०१/- रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र
विभाग : कुलाबा ते अंधेरी
* विजय कदम- बाळ गोपाळ मित्र मंडळ, विलेपाल्र्याचा पेशवा, विलेपार्ले (पूर्व)
* सचिन शेट्टी- रुस्तम रहिवासी गणेशोत्सव मंडळ, लोअर परळ
विभाग : जोगेश्वरी ते दहिसर
* उदय जाधव- नवतरुण मित्र मंडळ, दहिसर (पूर्व)
* अलोक मुसळे, नवशक्ती मित्र मंडळ, गोराई (२) बोरिवली (पश्चिम)
विभाग : छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मुलुंड
* संतोष परब, पंगेरी चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (राणीबागचा राजा) भायखळा
* विजय कदम, बाल मित्र मंडळ ,विक्रोळी पश्चिम
विभाग : ठाणे शहर
* महेंद्र विश्वकर्मा- हाजुरी उत्कर्ष मंडळ, ठाणे
* अभिजित मुरांजन- श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ, ठाणे (पश्चिम)
विभाग : डोंबिवली-कल्याण
* मंगेश नारकर- अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, डोंबिवली (पश्चिम)
* राकेश मारणे- जिजाईनगर मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव, डोंबिवली
विभाग : नवी मुंबई
’ नितीन प्रकाश पवार- नवयुग उत्सव मित्र मंडळ, नेरुळ
* किशोर पाटील- लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समिती, नेरुळ २