मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांची वैद्यकीय शिक्षण सचिव म्हणून तर अश्विनी भिडे यांची शालेश शिक्षण सचिवपदी बदली करण्यात आली आहे. अनिल डिग्गीकर राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, अश्विनी भिडे यांची शालेय शिक्षण सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुनील पोरवाल यांची वस्त्रोद्योग विभागात प्रधान सचिव म्हणून, बीपीन श्रीमाळी यांची महापारेषण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून तर एस. एम. सरकुंडे यांची ‘टेरी’चे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
विकास देशमुख यांची पुणे महापालिका आयुक्त, अभिषेक कृष्णा यांची नागपूर जिल्हाधिकारी, शैला ए. यांची मुंबई जिल्हाधिकारी, रूबबल अग्रवाल अहमदनगर जिल्हाधिकारी, राधाकृष्णन बी. यांची नाशिक जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. चंद्रशेखर ओक विक्रीकर विभागात सह आयुक्तपदी, के. एम. नागरगोजे ‘यशदा’त उपमहासंचालक, श्वेता सिंघल सोलापूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. अशुतोष सलील यांची चंद्रपूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रेरणा देशभ्रतार यांची जालना जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी, एम.पी. कल्याणकर अकोला महापालिकाआयुक्त म्हणून तर एम.एस.कलशेट्टी यांची यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Feb 2014 रोजी प्रकाशित
२० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांची वैद्यकीय शिक्षण सचिव म्हणून तर अश्विनी भिडे यांची शालेश शिक्षण सचिवपदी बदली करण्यात आली आहे.
First published on: 08-02-2014 at 02:58 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maha govt transfers 20 ias officers