मुंबईच्या परळ येथील माऊली सदन परिसरात मंगळवारी रात्री एका गोदामाला भीषण आग लागली. या परिसरात एमटीएनलचे गोदाम आहे. गोदामाजवळ असणाऱ्या मोबाईल टॉवरच्या जनरेटरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागली. दरम्यान, या आगीने भीषण स्वरूप धारण केले होते. गेल्या दोन तासांपासून अग्निशमन दलाकडून ही आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १४ गाड्या दाखल झाल्या आहेत. दरम्यान, अग्निशमन दलाला या आगीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. अद्यापर्यंत या आगीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 29-12-2015 at 22:16 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Major fire broke out in parel mumbai