Mumbai Murder : मुंबईतल्या गोराई या भागात एका माणसाचा मृतदेह सात तुकडे केलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. एका गोणीमध्ये हे सात तुकडे भरलेले होते. बाबरपाडा या ठिकाणी असलेल्या झुडुपांमध्ये ही गोणी भिरकावण्यात आली होती. मृतदेह सडू लागल्याने या भागात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. दुर्गंधी कुठून येते आहे याचा शोध घेतल्यानंतर नागरिकांना गोणी आणि त्यात तुकडे केलेल्या अवस्थेत मृतदेह ( Mumbai Murder ) आढळून आला. गोराई पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरु करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांना काय आढळून आलं?

पोलिसांनी गोणीतून मृतदेह बाहेर काढला तेव्हा पोलिसांना हात-पाय धड , डोकं असे वेगवेगळे अवयव सात डब्यांमधे भरलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी मृत व्यक्तीचा फोटो जवळच्या पोलीस ठाण्यांमध्ये पाठवून त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या घटनेची माहिती मिळताच गोराई परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेह कुणाचा? त्याची हत्या का करण्यात आली? तुकडे कुणी केली? मारेकरी कोण? अशा प्रश्नांची नागरिकांमध्ये कुजबूज सुरु आहे. या प्रकरणात छडा लावून मारेकऱ्याला शोधणं हे पोलिसांपुढे आव्हान आहे. कारण मृतदेहाचे सडणारे तुकडेच पोलिसांना आढळून आले आहेत.

हे पण वाचा- मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या

पोलिसांनी काय माहिती दिली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना गोणीत मृतदेहाचे सात तुकडे ( Mumbai Murder ) मिळाले. मृतदेहाचे अवयव वेगवेगळ्या डब्यांमध्ये भरण्यात आले होते. हे सगळे तुकडे गोळा करुन शवविच्छेदनासाठी ( Mumbai Murder ) पाठवण्यात आले आहेत. मृत व्यक्तीचे वय २५ ते ४० च्या आसपास असून त्याने निळ्या रंगाची जीन्स परिधान केली होती. त्याच्या पायात काळ्या रंगाचे बूट होते. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मृतदेहाच्या हातावर टॅटू असल्याने गूढ वाढलं

मृतदेहाचे हात-पाय कापून प्लॅस्टिकच्या वेगळ्या डब्यात ( Mumbai Murder ) ठेवण्यात आले होते. यापैकी उजव्या हाताच्या मनगटावर विशिष्ट अक्षरे कोरलेली असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र, अद्याप मृत व्यक्तीची ओळख पटू शकलेली नाही. पोलिसांकडून याप्रकरणाच्या तपासासाठी स्वतंत्र पथक तयार केले आहे. घटनास्थळी सापडलेले फॉरेन्सिक पुरावे आणि या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने पोलिसांनी याप्रकरणाचे धागेदोरे जुळवण्यास सुरुवात केली आहे. मृतदेहाची ( Mumbai Murder ) ओळख पटल्यानंतर तपासाला वेग येऊ शकतो आणि याप्रकरणी उकल होऊ शकते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man body hacked into seven pieces found in a gunny bag in gorai area of mumbai scj