मुंबई : कुर्ला काजुपाडा परिसरात गाळ्यामध्ये राहणाऱ्या दोन मित्रांमध्ये झालेल्या वादातून एकाने दुसऱ्याची हत्या करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपासाला सुरूवात केली आहे.

हेही वाचा – मुंबई : डोक्यात विटा पडून ६५ वर्षीय सुरक्षा रक्षकाचा मृत्यू, दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हेही वाचा – विधानसभा अध्यक्षांसह शरद पवार गटाच्या १० आमदारांना उच्च न्यायालयाची नोटीस

काजुपाडा परिसरातील घास कंपाऊंड येथील एका कपड्यांच्या गाळ्यामध्ये ही घटना घडली. आरोपी व मृत व्यक्ती दोघेही या गाळ्यामध्ये काम करतात. त्यांच्यात झालेल्या वादातून एकाने दुसऱ्याचा कैचीने गळा कापला. त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच साकीनाका पोलिस घटनास्थळी पोहोचले. उभयतांमधील भांडणातून हा प्रकार घडल्याचे सूत्रांनी सांगितले.