मुंबई : पायाभूत कामांसाठी मध्य रेल्वेवरील सीएसएमटी येथे ब्लाॅक सुरू आहे. त्यामुळे शेकडो रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला असून, रेल्वेगाड्या अवेळी धावत आहेत. तर, कोकण रेल्वेवर ३१ मे रोजी रत्नागिरी ते वैभववाडी रोड दरम्यान ब्लाॅक घेतल्याने, अनेक रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडणार आहे.

हेही वाचा >>> मुंबई : मिठागराच्या जागेवर बांधकामाच्या कचऱ्याचे ढीग

कोकण रेल्वेवरील रत्नागिरी- वैभववाडी रोड दरम्यान देखभाल-दुरूस्तीच्या कामासाठी, ३१ मे रोजी सकाळी ९.१० ते सकाळी ११.४० वाजेपर्यंत ब्लाॅक घेतला आहे. यावेळी गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी रोड ते दिवा एक्स्प्रेस सावंतवाडी रोड ते वैभववाडी रोडदरम्यान ८० मिनिटे थांबा घेईल. तसेच गाडी क्रमांक १२०५१ सीएसएमटी -मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस चिपळूण ते रत्नागिरी दरम्यान ४० मिनिटे थांबा घेईल. गाडी क्रमांक २२११९ सीएसएमटी ते मडगाव तेजस एक्स्प्रेस रत्नागिरीदरम्यान २० मिनिटांचा थांबा घेईल. यासह डाऊन मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेससह मुंबईकडे येणाऱ्या अप रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल होईल.