scorecardresearch

कोकण रेल्वे

उदरनिर्वाहासाठी कोकणामधील (Konkan) असंख्य लोक मुंबईकडे रवाना होऊन मिळेल ते काम करुन राहू लागले, त्यातील बहुसंख्य गिरण्यांमध्ये काम करत असतं. कोकणी माणसासाठी सण-उत्सव फार महत्त्वपूर्ण असतात. त्यासाठी गावाला जाण्यासाठी पूर्वी जहाजाचा प्रवास करावा लागे. पुढे एसटी आल्यानंतर चाकरमान्याचे कमी हाल होऊ लागले. पण हा प्रवास त्रासदायक असे. दरम्यानच्या काळात कोकणामध्ये जाण्यासाठी रेल्वे असावी असा विचार काहींच्या मनात आला. त्यात मुंबई व मंगळूर या दोन बंदरांदरम्यान थेट मार्ग नसल्यामुळे रेल्वे वाहतूक लांबच्या मार्गाने करावा लागे. उंचसखल भूभाग, अनेक नद्या, अतिवृष्टी या कारणांमुळे कोकणामध्ये रेल्वे विभाग उभारण्यास अडचणी येत होत्या. रेल्वे वाहतूक उपलब्ध नसल्यामुळे कोकणाचा विकास खुंटण्याची भिती लोकांमध्ये होती. जॉर्ज फर्नान्डिस यांच्या नेतृत्वाखाली कोकणी नेत्यांनी केंद्रामध्ये कोकण रेल्वे बांधण्याची मागणी केली. १९६६ साली दिवा-पनवेल रेल्वेचा मार्ग बांधला गेला व १९८६ मध्ये तो रोहापर्यंत वाढवला गेला.

१५ सप्टेंबर १९९० रोजी रोहा येथे कोकण रेल्वेचा (Konkan Railway) पायाभरणी समारंभ पार पडला. कोकण रेल्वेमार्गावरील पहिली रेल्वे २० मार्च १९९३ रोजी मंगळूर ते उडुपी दरम्यान धावली. १९९८ मध्ये कोकण रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले आणि १९ जुलै १९९९ रोजी सर्वप्रथम सर्वसामान्य नागरिकांना कोकण रेल्वेचा लाभ घेता आला.
Read More

कोकण रेल्वे News

kokan railway ajit pawar
कोकण रेल्वेच्या आरक्षणातील काळय़ा बाजाराची चौकशी करा, अजित पवार यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. त्यासाठी विशेष रेल्वे गाडय़ा सोडल्या जातात.

Ajit Pawars direct letter to Railway Minister after Konkan Railway Minutes became full due to brokers selling railway tickets illegally sgk 96
“रेल्वे तिकिटाची अवैध विक्री करणाऱ्या दलालांमुळे…”, कोकण रेल्वे मिनिटांत फुल्ल झाल्यावरून अजित पवारांचे थेट रेल्वेमंत्र्यांना पत्र

कोकणच्या चाकरमान्यांच्या सोईसाठी गणेशोत्सव काळात अतिरिक्त रेल्वे गाड्या कोकणात सोडण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्राव्दारे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना…

reservation of konkan railway
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाडय़ांच्या आरक्षणात गैरप्रकाराचा संशय; दीड मिनिटात प्रतीक्षा यादी हजारपार!

यंदा १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून, त्यानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची रेल्वेच्या तिकिटासाठी धडपड सुरू आहे.

Railway Ganpati Festival Ticket Booking
बाप्पांच्या स्वागतासाठी कोकणात जाताय? रेल्वेगाड्यांचे तिकिट बुकिंग ‘या’ दिवशी पासून सुरु होणार, लागा तयारीला!

बाप्पांच्या स्वागतासाठी आता जोरदार तयारी रेल्वेनेही केली आहे, तिकिट बुकिंग…

indian railway
पुणे: कोकणासाठी रेल्वेच्या उन्हाळी विशेष गाड्या

मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर कोकणासाठी विशेष गाड्या सोडण्यास सुरूवात केली आहे. रेल्वेकडून पुणे-रत्नागिरी आणि पनवेल-रत्नागिरी या साप्ताहिक गाड्या सोडण्यात…

konkan railway
मुंबई: कोकण रेल्वेच्या दोन एक्स्प्रेसला अतिरिक्त डबा जोडणार

कोकण रेल्वे प्रशासनाने दोन एक्स्प्रेसला तात्पुरत्या कालावधीसाठी प्रत्येकी एक अतिरिक्त डबा जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

tejas Express will run with second Vistadome coaches kokan route mumbai
मुंबई : विस्टाडोम डब्यासह धावणार तेजस एक्स्प्रेस ; कोकण मार्गावर दुसरा विस्टाडोम डबा

कोकण मार्गावर धावणाऱ्या मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला २०१८ मध्ये पहिल्यांदा विस्टाडोम डबा जोडण्यात आला होता.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

संबंधित बातम्या