मुंबई : कोकण रेल्वेवरील सावर्डा-रत्नागिरी विभागात देखभाल-दुरुस्तीच्या कामानिमित्त २३ फेब्रुवारी रोजी ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ७ ते सकाळी ९.३० वाजेपर्यंत २.३० तासांचा मेगाब्लॉक असेल. त्यामुळे कोकण रेल्वेवरील रेल्वेगाड्या विलंबाने धावतील.

हेही वाचा – धारावी पुनर्विकासाबाबत १ मार्चला धारावीत जाहीर सभा

हेही वाचा – आक्षेपार्ह चित्रफीतीच्या माध्यमातून व्यावसायिकाकडे २५ कोटींच्या खंडणीची मागणी, ३५ वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल

गाडी क्रमांक १२६१७ एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसचा प्रवास २२ फेब्रुवारी रोजी मडगाव दरम्यान १.४५ तासांसाठी थांबवण्यात येईल. तर, गाडी क्रमांक २०९२३ तिरुनेलवेली – गांधीधाम एक्स्प्रेसचा प्रवास २२ फेब्रुवारी रोजी सुरू होणारा प्रवास मडगाव दरम्यान १.१० तासांसाठी थांबवण्यात येईल. त्यामुळे या दोन्ही रेल्वेगाड्यांसह इतर रेल्वेगाड्या उशिरा धावतील.