वाढत्या किमतींमुळे म्हाडाच्या घरांसाठीच्या इच्छुकांची संख्या घटल्याने म्हाडाने ही घरे स्वस्त करण्याचे जाहीर केले आहे. घरांची किंमत ठरवताना बांधकाम खर्चावर आकारण्यात येणारे व्याज साडेचार टक्क्यांनी घटवण्यात आल्याने म्हाडाची मुंबईतील घरे ७५ हजारांपासून तीन लाखांपर्यंत स्वस्त झाली आहेत. ही ‘स्वस्ताई’ सध्या सुरू असलेल्या सोडतीतील घरांनाही लागू करण्यात आली असून अर्ज दाखल करण्यासाठीची मुदतही ११ जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.
यंदा मुंबईतील ८१४ तर विरार आणि वेंगुर्ला येथील एकूण १८२७ अशा २६४१ घरांसाठी सोडत काढण्यात आली असून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. मात्र या घरांच्या चढय़ा किमतींमुळे गृहेच्छुकांची संख्या मोठय़ा प्रमाणात घटली आहे. त्यामुळे म्हाडाच्या वर्तुळात चलबिचल सुरू झाली होती. घरांची किंमत ठरवताना बांधकाम खर्चावर वार्षिक १४.५ टक्के दराने व्याज आकारले जाते. त्याऐवजी दहा टक्के करण्याचे प्राधिकरणाने ठरवले. त्यानुसार नवीन सूत्रानुसार या सोडतीमधील घरांची सुधारित किंमत ‘म्हाडा’ने जाहीर केली आहे.
* बुधवापर्यंत ‘म्हाडा’च्या कोकण मंडळातील घरांसाठी ८७३९ अर्ज दाखल झाले होते. तर मुंबई मंडळातील घरांसाठी ७४ हजार ५७२ अर्ज दाखल झाले
घरांची स्वस्ताई
* मुंबईतील घरांची किंमत ७५ हजारांपासून ते तीन लाख ९९ हजार रुपयांपर्यंत कमी
* विरार येथील घरांची किंमत एक लाख ४८ हजार रुपयांपासून ते दोन लाख ७९ हजार रुपयांपर्यंत कमी.
* वेंगुल्र्यातील घरांच्या किमती २६ हजार रुपयांपासून एक लाख ३० हजार रुपयांपर्यंत कमी.
सोडतीला मुदतवाढ
* ऑनलाइन अर्जासाठी नोंदणी करण्याची मुदत सात जूनपर्यंत
* ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत नऊ जूनपर्यंत.
* अनामत रकमेसह बँकेत अर्ज दाखल करण्याची मुदत ११ जूनपर्यंत
* सोडत २५ जून रोजी रंगशारदात
म्हाडाच्या घरांच्या किमतीत कपात
मुंबईतील घरांची सुधारित किंमत (कंसात आधीची किंमत)
१. मानखुर्द (अत्यल्प उत्पन्न गट) – १५,४९,२०० रुपये (१६,२६,५००)
२. मागाठाणे, बोरिवली (अत्यल्प उत्पन्न गट) – १३,८९,००० रुपये (१४,६४,५००)
३. विनोबा भावे नगर, कुर्ला (अल्प उत्पन्न गट) – १९,२३,००० रुपये (२०,३८,३००)
४. प्रतीक्षा नगर, शीव टप्पा ४ (मध्यम उत्पन्न गट) – २९,१५,४०० रुपये (३१,८३,६००)
५. तुंगवा, पवई (मध्यम उत्पन्न गट) – ४८,०७,६६६ रुपये (४८,८६,५००)
६. शैलेंद्रनगर, दहिसर (उच्च उत्पन्न गट) – ७६,९९,००० रुपये (८०,९८,५००)
७. कोलेकल्याण, सांताक्रूझ (उच्च उत्पन्न गट) – ७६,९९,००० रुपये (७९,२३,९००)
८. तुंगवा, पवई (उच्च उत्पन्न गट) – ७४,०१,३५९ रुपये (७५,२२,७००)
विरार येथील घरांची सुधारित किंमत
अल्प उत्पन्न गट – २४,७१,५८५ रुपये (२६,१९,९०९)
मध्यम उत्पन्न गट – ४७,४२,६८६ रुपये (५०,२१,६१४)
संग्रहित लेख, दिनांक 29th May 2014 रोजी प्रकाशित
म्हाडाची घरे तीन लाखांनी स्वस्त!
वाढत्या किमतींमुळे म्हाडाच्या घरांसाठीच्या इच्छुकांची संख्या घटल्याने म्हाडाने ही घरे स्वस्त करण्याचे जाहीर केले आहे.
First published on: 29-05-2014 at 06:36 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mhada affordable homes worth 3 lakh