‘म्हाडा’ या संस्थेच्या संकेतस्थळाशी मिळतेजुळते असे बनावट संकेतस्थळ बनवणाऱ्यांविरोधात म्हाडाने सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. या संकेतस्थळावरून म्हाडा सोडतीतील बनावट प्रतीक्षा यादीही प्रसिद्ध होत होती. ही माहिती म्हाडाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाला मिळाल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर आता हे संकेतस्थळ बंद करण्यात आले आहे. म्हाडाचे अधिकृत संकेतस्थळ http://www.mhada.gov.in हे आहे. हे संकेतस्थळ नेट मॅजिक डाटा सेंटरमध्ये होस्ट करण्यात येते. मात्र या संस्थेच्या नावाने http://www.mhada.net हे बनावट संकेतस्थळ सुरू करण्यात आले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत नेट मॅजिक डाटा सेंटरकडून म्हाडाने या बनावट संकेतस्थळाबाबत अहवाल मागवत हे संकेतस्थळ बंद केले. या बनावट संकेतस्थळामुळे लोकांची आर्थिक फसवणूक होऊ नये, यासाठी कारवाई करण्यात आली. याबाबत सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Oct 2014 रोजी प्रकाशित
‘म्हाडा’चे बनावट संकेतस्थळ बंद
‘म्हाडा’ या संस्थेच्या संकेतस्थळाशी मिळतेजुळते असे बनावट संकेतस्थळ बनवणाऱ्यांविरोधात म्हाडाने सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.
First published on: 22-10-2014 at 12:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mhada fake website off