अंधेरीतील शहाजीराजे क्रीडा संकुलामध्ये क्रिकेट अकादमी सुरू करण्यासाठी क्रिकेटपटू हरभजन सिंगने महापालिकेकडे जागेची मागणी केली होती. परंतु हरभजनच्या या मागणीला विरोध करीत मनसे आणि भाजपाने महाराष्ट्रातील मराठी क्रिकेटपटूंना प्राधान्य द्या अशी भूमिका घेतली आहे. तसे पत्रही महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना दिले आहे.
मुंबई शहरातून मोठे झालेले आणि जगभरात नावारूपाला आलेले अजित आगरकर, दिलीप वेंगसरकर, वासिम जाफर यासारखे अनेक खेळाडू आहेत. त्यामुळे महापालिकेने हरभजनसिंगला जागा देण्यापूर्वी राज्यभरातील खेळाडूंचा विचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यभरातील खेळाडूंकडून स्वारस्य निवेदन मागवून महापालिकेने हा निर्णय घ्यावा, अशी भूमिका भाजपाचे आमदार आशीष शेलार यांनी घेतली आहे. तर हरभजनसिंगऐवजी मराठी खेळाडूंना प्रथम प्राधान्य द्यावे अशी मागणी मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी केली आहे. परंतु महापौरांनी मात्र हरभजनच्या मागणीला हिरवा कंदील दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns and bjp opposed to academy of harbhajan singh in mumbai