मुंबई : शीव येथील मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक महापालिका सामान्य रुग्णालयाच्या आवारात शुक्रवारी रात्री भरधाव वेगात आलेल्या मोटारगाडीने एका वृद्ध महिलेला धडक दिली. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची मााहिती पोलिसंनी दिली.
शीव पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लोकमान्य टिळक महापालिका सामान्य रुग्णालयाच्या आवारात शुक्रवारी रात्री एक डॉक्टर भरधाव वेगात गाडी चालवत होता. त्यावेळी त्याने वृद्ध महिलेला धडक दिली. या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. याप्रकरणी प्राथमिक तपास अहवाल नोंदवून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र अद्याप डॉक्टरला अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.