मुंबईः अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचे अश्लील छायाचित्र मित्राला पाठवणाऱ्या १६ वर्षीय मुलाविरोधात चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने मुलीचे छायाचित्र पाठवलेल्या २१ वर्षीय तरुणाविरोधातही चारकोप पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी १६ वर्षीय आरोपीची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – लिपिक पदाच्या भरतीसाठी मुंबई महानगरपालिकेची पुन्हा जाहिरात, प्रचंड विरोधानंतर ‘ही’ अट वगळली

हेही वाचा – नौदल अधिकाऱ्याची २२ लाखांची सायबर फसवणूक, सांताक्रुझ येथील आरोपीला अटक

पीडित मुलगी १७ वर्षांची आहे. १६ वर्षीय आरोपीने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केला. तसेच तिचे अश्लील छायाचित्र २१ वर्षांच्या मित्राला पाठवले. घटनेनंतर पीडित मुलीने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानुसार आईने याबाबत चारकोप पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी भादंवि कलम ३८० व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायदा कलम ४, ८, १२ व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम ६७ अंतर्गत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी १६ वर्षीय मुलाची डोंगरी बालसुधारगृहात रवानगी केली आहे. तसेच आरोपीने छायाचित्र पाठवलेल्या २१ वर्षीय तरुणाचा सहभागाबाबत पोलीस तपास करत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai crime news minor girl tortured and sent an obscene photograph to a friend case registered against two people including a minor mumbai print news ssb