मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाने अर्थात NCB ने आता आणखी एका तरुणाला ताब्यात घेतलं आहे. मंगळवारी (६ ऑक्टोबर) रात्री पवई परिसरातून ताब्यात घेण्यात आलेल्या या व्यक्तीकडून ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. अंकित कुमार असं या व्यक्तीचं नाव आहे. NCB च्या पथकाकडून मंगळवार रात्रीपासून पुन्हा वांद्रे, जुहू आणि गोरेगाव परिसरात ठिकठिकाणी छापे घालण्यात येत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एनसीबीने शनिवारी (२ ऑक्टोबर) संध्याकाळी मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर छापा टाकला. प्रवासी जहाजावर अंमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी एनसीबीने रविवारी (३ ऑक्टोबर) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ जणांना अटक केली. याच पार्श्वभूमीवर, मुंबईत एनसीबीचं धाडसत्र अद्याप सुरु आहे. मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत NCB कडून अंमली पदार्थ पुरवणाऱ्यांना ताब्यात घेतलं जात आहे.

मुंबईतील रेव्ह पार्टीत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कराचा सहभाग; एनसीबीची कोर्टात धक्कादायक माहिती

एनसीबीने यापूर्वी रविवारी रात्रीपासून सोमवारी (४ ऑक्टोबर) पहाटेपर्यंत वेगवेगळ्या वेळी वांद्रे, अंधेरी, लोखंडवाला या ठिकाणी छापेमारी करत अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्याला ताब्यात घेतल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं होतं. यामार्फत कोणाच्या माध्यमातून आणि कशापद्धतीने हे अंमली पदार्थ पुरवले जातात या संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती एनसीबीच्या हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

क्रूझवर काय काय सापडलं?


आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर ‘एनसीबी’ने शनिवारी ही कारवाई केली. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी, २ ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला. त्यात पाच ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी), १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या व एक लाख ३३ हजारांची रोकड जप्त करण्यात आले आहेत. सशयितांच्या रक्ताचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai ncb took into custody one powai recovered drugs gst