फेसबुकवरून मैत्रिणीला अश्लील शेरेबाजी केल्यामुळे सुमेध पाडवे (२८) या तरुणाला नागपाडा पोलिसांनी अटक केली. नंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले.
मीरा रोड येथे राहणारा सुमेध सहाय्यक दिग्दर्शक म्हणून लघुपट बनवतो. काही महिन्यांपूर्वी कोमल (नाव बदललेले) या पदवीधर तरुणीशी त्याची ओळख झाली. त्यातून तो तिच्यावर प्रेम करू लागला. परंतु सुमेधच्या वागण्यामुळे कोमलने त्याच्या प्रेमाचा प्रस्ताव नाकारून मैत्रीचे संबंधही तोडले. तरीही सुमेध तिला त्रास देत होता.
दरम्यान, कोमलला त्रास देण्यासाठी फेसबुकवरून तो अश्लील शेरेबाजी करू लागला. सतत दोन महिने हा प्रकार सुरू होता. अखेर कोमलने नागपाडा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. नागपाडा पोलिसांनी सुमेधला ‘विनयभंग ३५४ ड’ आणि माहिती अधिकार कायद्याच्या कलम ६६ अंतर्गत अटक केली.
सुमेधला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. नवीन तरतुदीप्रमाणे फेसबुक किंवा अन्य सामाजिक संकेतस्थळांवर अश्लील मजकूर टाकल्यास विनयभंगाचा गुन्हा दाखल होतो, अशी माहिती नागपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार मेहेतर यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 28th Feb 2014 रोजी प्रकाशित
फेसबुकवरील अश्लील शेरेबाजी तरुणाला महागात
फेसबुकवरून मैत्रिणीला अश्लील शेरेबाजी केल्यामुळे सुमेध पाडवे (२८) या तरुणाला नागपाडा पोलिसांनी अटक केली. नंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले.
First published on: 28-02-2014 at 02:55 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpada police arrest youth for posting obscene remark on facebook