मुंबई : क्रुझवरील अमली पदार्थ पार्टीप्रकरणी अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यनसह अन्य आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाला (एनसीबी) आणखी ९० दिवसांची मुदतवाढ देण्यास विशेष न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. त्याऐवजी न्यायालयाने एनसीबीला आरोपपत्र दाखल करण्यासाठी ६० दिवसांची मुदत दिली. प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी ९० दिवसांची मुदत देण्याच्या मागणीसाठी एनसीबीच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) सोमवारी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. बुधवारी न्यायालयाने अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता.
संग्रहित लेख, दिनांक 1st Apr 2022 रोजी प्रकाशित
आरोपपत्रासाठी एनसीबीला ९० ऐवजी ६० दिवसांची मुदतवाढ
क्रुझवरील अमली पदार्थ पार्टीप्रकरणी अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यनसह अन्य आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाला (एनसीबी) आणखी ९० दिवसांची मुदतवाढ देण्यास विशेष न्यायालयाने गुरुवारी नकार दिला.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 01-04-2022 at 02:06 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncb extension instead chargesheet on cruise practical substance party matters ysh