सार्वजनिक बांधकाममंत्री म्हणून छगन भुजबळ यांनी गेल्या काही वर्षांत केलेले ‘उद्योग’ सर्वानाच माहित आहेत, लोकलेखा समितीने त्यातील थोडासाच भ्रष्टाचार बाहेर आणला तर एवढय़ा मिरच्या झोंबल्या. मग अशी कामे करायचीच कशाला, असा सवाल करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस आणि सरकारला बदनाम करणारे भुजबळ हेच झारीतील शुक्राचार्य आहेत, असा घरचा आहेर राष्ट्रवादीचे आमदार विनायक मेटे यांनी दिला. दिल्लीतील महाराष्ट्र सदन, मलबार हिल येथील हायमाऊंट विश्रामगृह, अंधेरी येथील आरटीओ कार्यालयाच्या उभारणीत हजारो कोटींचा घोटाळा झाला असून ठेकेदाराच्या हितासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियम पायदळी तुडविल्याचा ठपका लोकलेखा समितीने ठेवला होता.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Mar 2014 रोजी प्रकाशित
भुजबळच पक्षाला बदनाम करणारे झारीतील शुक्राचार्य-मेटे
सार्वजनिक बांधकाममंत्री म्हणून छगन भुजबळ यांनी गेल्या काही वर्षांत केलेले ‘उद्योग’ सर्वानाच माहित आहेत, लोकलेखा समितीने त्यातील थोडासाच भ्रष्टाचार बाहेर आणला
First published on: 02-03-2014 at 04:54 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader vinayak mete lashes out at bhujbal over pac report