नवीन शैक्षणिक वर्षात शाळेचा प्रारंभ चैतन्यमय आणि उत्साहवर्धक झाल्यास शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळते ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन या शैक्षणिक वर्षात शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये येणा-या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा प्रवेशोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या निर्णय शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतला. हा कार्यक्रम विदर्भामध्ये २६ जून आणि उर्वरीत महाराष्ट्रामध्ये १५ जून रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तावडे म्हणाले, शाळा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी शिक्षकांनी शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था तसेच स्थानिक सेवाभावी संस्था यांच्या सहकार्याने शाळेत नव्याने येणा-या विद्यार्थ्यांच्या घरी भेट देणे, शाळा परिसरात पदयात्रा काढणे व शाळा परिसर स्वच्छ व सुशोभित करणे असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे.
शाळा सुरु होण्याच्या दिवशी शिक्षकांनी वेळेवर उपस्थित राहून प्रभातफेरी आयोजन करणे, विद्यार्थ्यांचे फुले देऊन स्वागत करणे, मोफत पुस्तक वितरण आदी कार्यक्रम आयोजित करणे. अशा पद्धतीने प्रवेशोत्सव हा कार्यक्रम साजरा करण्यात यावा.
शाळेच्या पहिल्या दिवशी माध्यान्ह भोजनातील जेवणात गोड पदार्थांचा समावेश करण्यात येईल तसेच शाळेच्या प्रथम दिवशी स्थानिक कलाकार अथवा आजी-माजी विद्यार्थी यांनी शिक्षणाच्या दृष्टीने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असतील तर त्यांना प्रोत्साहन देण्यात येईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.
  संग्रहित लेख, दिनांक 4th Jun 2015 रोजी प्रकाशित  
 शाळेच्या पहिल्या दिवशी राज्यात प्रवेशोत्सव कार्यक्रम
हा कार्यक्रम विदर्भामध्ये २६ जून आणि उर्वरीत महाराष्ट्रामध्ये १५ जून रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  First published on:  04-06-2015 at 04:16 IST  
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New educational year celebration in all schools in maharashtra