बिहारमध्ये बडय़ा उद्योगसमूहांनी गुंतवणूक करावी, यासाठी मुख्यमंत्री नितीशकुमार प्रयत्नशील असून त्यांनी शनिवारी अनेक उद्योगपतींची बैठक घेऊन चर्चा केली. बिहारमध्ये खासगी गुंतवणूक वाढल्याशिवाय दोन आकडी विकासदर राखणे शक्य होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘बिहार इंडस्ट्रियल इन्व्हेसमेंट अ‍ॅडव्हायझरी कौन्सिल’ च्या बैठकीसाठी नितीशकुमार शनिवारी मुंबईत होते. बिहारचा विकासदर १४.५ टक्क्य़ांवर गेला असून तो देशातील कोणत्याही राज्यापेक्षा सर्वाधिक आहे. तेथे सार्वजनिक क्षेत्रात आणि काही प्रमाणात स्थानिक उद्योजकांकडून गुंतवणूक झाली. पण बडय़ा कंपन्या व उद्योगसमूहांची गुंतवणूक वाढल्याशिवाय विकासदर वाढ अधिक काळ टिकविणे साध्य होणार नाही, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. बैठकीस वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल आगरवाल, एचडीएफसीचे दीपक पारेख, आयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर, अ‍ॅक्सिस बँकेच्या शिखा शर्मा, सेबीचे यू.के. सिन्हा, स्टार इंडियाचे उदय शंकर आदी उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish kumar tries to bring big industries in bihar