सण, समारंभ, उत्सव या काळात सर्रास रस्त्यावर मंडप उभारून कर्णकर्कश आवाजात ध्वनिक्षेपक लावण्याचे प्रकार यापुढे संपुष्टात येणार आहे. मंडप उभारणीच्या या उत्साही उत्सवालाच उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. तसेच बेकायदा मंडपांना आळा घालण्याच्या दृष्टीनेही राज्य सरकारने दोन महिन्यांत धोरण आखावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मंडप उभारणीसाठी पालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांना बहाल करण्यात आलेले विशेषाधिकारही न्यायालयाने मोडीत काढले आहेत. यापुढे कोणतीही मंडप उभारणी पोलीस आयुक्त वा पोलीस अधीक्षकांच्या सल्ल्यानंतरच केली जावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
उत्सव काळात सर्रास रस्त्यांवरच मंडपांची उभारणी केली जाते. रहदारीचे रस्ते, रुग्णालय परिसर, रेल्वे स्थानकांबाहेरचा परिसर, बस-टॅक्सी वा रिक्षा स्टॅण्ड, शिक्षण संस्था आदी परिसरांना त्यासाठी वेठीस धरले जाते. मंडपांवर ध्वनिक्षेपकही लावले जातात. या प्रकारांना आळा घालण्यात यावा यासाठी ठाण्यातील रहिवासी डॉ. महेश बेडेकर यांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर निकाल देताना न्यायमूर्ती अभय ओक व न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिले. उत्सव काळात रस्त्यांवर मंडप उभारण्यास व ध्वनिक्षेपक लावण्यास परवानगी दिली जाते. कायद्याने अशी परवानगी देता येत नाही. परंतु पालिका आयुक्त किंवा जिल्हाधिकारी आपल्या विशेषाधिकारात अशी परवानगी देतात. मात्र चालण्यासाठी पदपथ आणि सुरळीत वाहतुकीसाठी रस्ते हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे रहदारीचे रस्ते, रुग्णालय परिसर, रेल्वे स्थानकांबाहेरील परिसर, टॅक्सी वा रिक्षा स्टॅण्ड, शिक्षण संस्था आदी परिसरात उत्सव काळात मंडपे उभारण्यास परवानगी दिली जाऊ नये, असे आदेश न्यायालयाने दिले. परिसर, बस-टॅक्सी वा रिक्षा स्टॅण्ड, शिक्षण संस्था आदी परिसरांना त्यासाठी वेठीस धरले जाते. ध्वनिक्षेपकही लावले जातात. या प्रकारांना आळा घालण्यात यावा यासाठी ठाण्यातील रहिवासी डॉ. महेश बेडेकर यांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर निकाल देताना न्यायमूर्ती अभय ओक व न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिले. उत्सव काळात रस्त्यांवर मंडप उभारण्यास व ध्वनिक्षेपक लावण्यास परवानगी दिली जाते. कायद्याने अशी परवानगी देता येत नाही. परंतु पालिका आयुक्त किंवा जिल्हाधिकारी आपल्या विशेषाधिकारात अशी परवानगी देतात. मात्र चालण्यासाठी पदपथ आणि सुरळीत वाहतुकीसाठी रस्ते हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे रहदारीचे रस्ते, रुग्णालय परिसर, रेल्वे स्थानकांबाहेरील परिसर, टॅक्सी वा रिक्षा स्टॅण्ड, शिक्षण संस्था आदी परिसरात उत्सव काळात मंडपे उभारण्यास परवानगी दिली जाऊ नये, असे आदेश न्यायालयाने दिले.

राजकीय मंडळींकडून सण-उत्सवांच्या नावाखाली मोठय़ा प्रमाणात धिंगाणा घातला जात असून सण साजरा करण्याची ही पद्धत कधीच नव्हती. रस्त्यांचा वापर हा वाहतुकीसाठीच होणे आवश्यक आहे; मात्र सण-उत्सवाच्या नावाखाली रस्त्यात मांडव घालून ते अडवले जातात. त्यामुळे सण साजरे करण्याच्या मूळ संकल्पनेलाच हरताळ फासला जात आहे. ध्वनिप्रदूषणविरहित आणि रस्त्यांवर अतिक्रमण टाळून उत्सव साजरा करणे गरजेचे आहे. चांगल्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यासाठी समाजातील सगळ्याच घटकांना एकत्र येऊन नियोजन करायला हवे.
– डॉ. महेश बेडेकर, याचिकाकर्ते

तक्रारदाराला संरक्षण
रस्त्यांवर उभारण्यात येणाऱ्या मंडपांप्रकरणी नागरिकांना बिनधास्तपणे तक्रार नोंदवता येईल, अशी यंत्रणा उभी करण्याचे आणि त्यासाठी धोरण आखण्याचे आदेशही न्यायालयाने सरकारला दिले आहेत. सरकारने तसे आदेश सर्व पालिका, नगर परिषदांना द्यावेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे तक्रारीची दखल घेऊन नियम धाब्यावर बसविणाऱ्या उत्सव मंडळांवर उत्सव संपण्यापूर्वीच कारवाई करण्याचेही बजावले आहे. याचबरोबर तक्रारदाराला पोलीस संरक्षण पुरवावे, असेही आदेशात म्हटले आहे.

न्यायालयाचे आदेश..
*दूरध्वनी, ई-मेल किंवा एसएमएसद्वारे कोणत्याही ठिकाणाहून ध्वनी प्रदूषणाची तक्रार नोंदवता येईल, अशा प्रकारची यंत्रणा उभारली जावी.
*आवश्यक त्या परवानगीशिवाय ध्वनिक्षेपकास परवानगी देऊ नये.
*तक्रारीनंतर संबंधित यंत्रणांनी तात्काळ कारवाई म्हणून मंडप उभारण्यास वा ध्वनिक्षेपकास दिलेला परवाना निलंबित करावा.
*ध्वनी प्रदूषण नियमांनुसार कारवाई करणाऱ्या यंत्रणांची नावे प्रसिद्ध करावीत.
*दोन महिन्यांत सर्व पालिकांनी तक्रार निवारण यंत्रणा उभारावी.
*अटींचा भंग करणाऱ्या आयोजकांना नव्याने परवाना देऊ नये.    

या मंडळांना फटका मुंबई</strong>
*फोर्टचा चिंतामणी
*एकता नगर सार्व. गणेशोत्सव मंडळ, कांदिवली
*कारदार गॅरेज, परळ व्हिलेज
*उत्तर भारतीय क्रीडा मंडळ, धारावी,
* सिक्स्टी फिटचा महाराजा, धारावी
*अखिल सी. पी. टँक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
*बापट मार्ग सार्व. गणेश मंडळ
ठाणे
*संघर्ष संस्थेची दहीहंडी व गणेशोत्सव
*आनंद दिघे चॅरिटेबल ट्रस्टची दहीहंडी
*टेंभी नाक्यावरची शिवसेना पुरस्कृत दहीहंडी आणि नवरात्रोत्सव
*खेवरा सर्कल येथील शिवसेना पुरस्कृत मंडळाचा गणेशोत्सव
*चंदनवाडी परिसरातील शिवसेना पुरस्कृत गणेशोत्सव