विनाकारण व विनंतीशिवाय केल्या गेलेल्या बदल्यांच्या विरोधात महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनकडून २८ जुलै रोजी आझाद मैदान येथे धरणे धरण्यात येणार आहे. बदल्यांचा निर्णय रद्द न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.
कामाच्या बदलणाऱ्या वेळा व रात्रपाळी करताना आधीच परिचारिकांच्या कुटुंबाची घडी बिघडलेली असताना विनाकारण आणि विनंतीशिवाय केलेली बदली यामुळे कुटुंब उध्वस्त होत आहेत. कामाचे वाढवलेले तास, देय सुट्टय़ा न देणे, सक्तीच्या बदल्या, रिक्त पदे याबाबत अनेकदा वैद्यकीय शिक्षण विभागाशी चर्चा करण्यात आली आहे. मात्र याबाबत प्रतिसाद मिळाला नसल्याने आंदोलनाचे हत्यार हाती घेण्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jul 2015 रोजी प्रकाशित
परिचारिकांचे आंदोलन
विनाकारण व विनंतीशिवाय केल्या गेलेल्या बदल्यांच्या विरोधात महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनकडून २८ जुलै रोजी आझाद मैदान येथे धरणे धरण्यात येणार आहे
First published on: 24-07-2015 at 06:06 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nurses protest azad maidan