घरात झोपलेल्या एका ८२ वर्षीय वृद्धेला मारहाण करून तिच्याकडील दीड लाखांचे दागिने लुटून नेल्याची घटना प्रभादेवी येथे घडली.
प्रभादेवी येथील नागू सयाजी मार्गावरील सुंदरलाल रामजी पत्रा चाळीत शांतीदेवी गुप्ता (८२) या वृद्ध महिला कुटुंबियांसह राहतात. ही चाळ ब्रिटीशकालीन असून सर्व खोल्या एकमेकांना जोडलेल्या आहेत. घरातील खोलीत गुप्ता या एकटय़ाच झोपल्या होत्या. त्यांनी दाराला कडी लावलेली नव्हती. ती संधी पाहून रात्री दीडच्या सुमारास अज्ञात चोराने प्रवेश केला आणि झोपलेल्या गुप्ता यांच्या हातातील सोन्याच्या बांगडय़ा आणि कानातील कर्णफुले खेचण्याचा प्रयत्न केला.
झोपेतून जागे झालेल्या गुप्ता यांना चोराने मारहाण केली. त्यांनी मदतीचा धावा करेपर्यंत चोर दीड लाखांचा ऐवज घेऊन फरार झाला असल्याची माहिती परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी दिली. गुप्ता यांनी बेडरूम तसेच व्हरांडय़ामधील दिवे मालवले होते. चाळीच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरा आहे. मात्र अंधारामुळे चोर दिसू शकला नाही. दादर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jan 2014 रोजी प्रकाशित
वृद्धेला मारहाण करून दागिन्यांची लूटमार
घरात झोपलेल्या एका ८२ वर्षीय वृद्धेला मारहाण करून तिच्याकडील दीड लाखांचे दागिने लुटून नेल्याची घटना प्रभादेवी येथे घडली.
First published on: 05-01-2014 at 02:51 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ornaments stolen beat up old woman