कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्येच लपून बसल्याच्या शक्यतेला बळ देणारा आणखी एक पुरावा समोर आला आहे. खुद्द दाऊदची पत्नी मेहजबीन हिने दुरध्वनीवरील संभाषणात आपण कराचीत असल्याची कबुली दिली आहे. ‘टाइम्स नाउ’ वृत्तवाहिनीच्या पत्रकारांनी तिच्याशी दुरध्वनीवरून केलेल्या संभाषणात ही गोष्ट उघडकीस आली. तत्पूर्वी शनिवारी सकाळीच दाऊद कराचीतील क्लिफ्टन येथे राहत असल्याचे सबळ पुरावे भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राकडून प्रकाशित करण्यात आले होते. भारतीय सुरक्षा यंत्रणेला दाऊदचा पाकिस्तानातला पत्ता, फोनबील, पासपोर्ट ही महत्त्वाची कागदपत्रे मिळाल्याचेही या वृत्तात म्हटले होते. यामधील फोनबीलवर असणाऱ्या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर फोनवरील व्यक्तीने ती मेहजबीन शेख असल्याचे सांगितले. तसेच तुम्ही दाऊद इब्राहिमच्या पत्नी आहात का, असे विचारल्यानंतर तिच्याकडून होकारार्थी उत्तर देण्यात आले. मात्र, आम्ही त्यांच्याशी बोलू शकतो का, असे विचारल्यानंतर त्या स्त्रीने दाऊद आता झोपले आहेत, तुम्ही नंतर फोन करा असे सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Aug 2015 रोजी प्रकाशित
दाऊद कराचीमध्येच, पत्नी मेहजबीनची दुरध्वनीवरून माहिती
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्येच लपून बसल्याच्या शक्यतेला बळ देणारा आणखी एक पुरावा समोर आला आहे.

First published on: 22-08-2015 at 07:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Phone conversation with dawoods wife