मेट्रोच्या तिसरा टप्प्याअंतर्गत आरे वसाहतीत रस्ता रुंदीकरण आणि कारशेडच्या बांधकामासाठी एमएमआरडीएतर्फे मोठय़ा प्रमाणावर वृक्षतोडी करण्यात येत असल्याचा आरोप करत त्याविरोधात केलेल्या याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावल्या. कारशेडच्या बांधकामासाठी वृक्षतोड करावी लागणार असा प्रस्तावच वृक्ष प्राधिकरणाकडे सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे वृक्षतोडीचा संबंध नाही आणि वृक्ष प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय वृक्षतोड केली जाणार नाही, हे एमएमआरडीएचे म्हणणे मान्य करत न्यायालयाने याविरोधात अरूण जॉर्ज तसेच ‘वनशक्ती’ या संस्थेने केलेल्या याचिका फेटाळून लावल्या.